Photo Credit- Team Navrashtra एकनाथ शिंदेंच्या सन्मानावरून संजय राऊत जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्यानंतर महाविकास आघाडीत तणाव वाढला आहे. यामुळे शिवसेना (ठाकरे गट) नाराज झाली असून खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांवर प्रत्युत्तर देत स्पष्ट केले की, शरद पवार कुठल्या मंचावर जातील, हे ठरवण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मित्रधर्माची आठवण करून देत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, “जो महाराष्ट्रद्रोही आहे, तो देशद्रोही देखील असतो.”
Delhi New Chief Minister: कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री? ‘या’ दिवशी होणार शपथविधी? पहा अंदर की बात
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राजकारण आणि सामाजिकता हे दोन वेगळे विषय आहेत. शरद पवार असे नेते आहेत, जे कधीही सूड किंवा द्वेषाची भावना ठेवत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, पवार असं का करतात? कारण ते मोठ्या मनाचे नेते आहेत. अनेक वेळा पवार अशा ठिकाणी गेले आहेत, जिथे त्यांचं जाणं अपेक्षित नव्हतं. ज्यांनी त्यांच्या राजकारणात अडथळे निर्माण केले आणि त्यांच्या पक्षाला गुमराह करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशीही त्यांना कोणताही राग नाही.”
आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “मी पवार यांच्या वय, वरिष्ठता किंवा तत्वांवर भाष्य करणार नाही. मात्र, मित्रपक्ष म्हणून आपलं कर्तव्य आहे की, शिंदे यांसारख्या व्यक्तीचा सन्मान करू नये. शिंदेंनी केवळ आमची पार्टी आणि कुटुंबच विभागले नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासालाही खीळ घातली आहे. जो महाराष्ट्रद्रोही आहे, तो देशद्रोहीही असतो.”
BCCI ने बदलला Luggage चा नियम; टीम इंडियाच्या एका खेळाडूमुळे ‘बीसीसीआय’ला
मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान केला. यावेळी त्यांनी शिंदेंची प्रशंसा केली. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “महाराष्ट्राचं राजकारण एका विचित्र वळणावर जात आहे. कोण टोपी घालतोय आणि कोणाची टोपी उडतेय, हे स्पष्ट होत आहे.”
राऊत पुढे म्हणाले, “पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असं आम्हाला वाटतं. आम्हाला याचं दुःख आहे की, तुम्ही अशा लोकांना सन्मान देताय, ज्यांनी महाराष्ट्र सरकार पाडली आणि शिवसेना फोडली. राजकारणात काही गोष्टी टाळायला हव्यात.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल एक विधान केलं होतं, तेव्हा आमच्या पक्षातील अनेक लोकांनी मला माफी मागण्यास सांगितलं. मी शरद पवारांना फोन करून विचारलं की, ‘मी चुकीचं बोललो का?’ त्यावर पवारांनी उत्तर दिलं, ‘तू या विषयाचा अभ्यास करून आपली भूमिका मांडली आहेस, त्यामुळे तू चुकीचा नाहीस. हीच पवारांची विचारसरणी आहे. आम्ही ‘विश्वासघात’ हा शब्द सहन करणार नाही. हे लक्षात ठेवा, संघर्षाचा क्षण आलाच, तर शरद पवार तुम्हांला वाटतं त्यापेक्षा जास्त आक्रमक असतील.”