संग्रहित फोटो
इंदापूर : पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाने उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळवाडी ते बिटरगाव वांगी पर्यंतचा परिसर पिंजून काढत वाळू उपसा करणाऱ्या १३ बोटी पकडून बुडवून नष्ट केल्या. ३ सक्शन बोटी जप्त केल्या आहेत, या कारवाईने वाळू माफियांना सुमारे २ कोटी ६० रुपयांचा दणका बसला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, करमाळ्याचे निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे, इंदापूरचे मंडलाधिकारी श्याम झोडगे, माळवाडीचे मंडलाधिकारी औदुंबर शिंदे, काटीचे मंडलाधिकारी मल्लाप्पा ढाणे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, भूषण सुरवडकर, करमाळा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र कदम, ग्राम महसूल आधिकारी चंद्रकांत नावाडे, गोरक्षनाथ ढोकणे, यादव ठोंबरे, मंगलसिंग गुसिंगे, इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील सुनील राऊत, प्रदीप भोई, अरुण कांबळे, विजयकुमार करे, बाळासाहेब कडाळे इंदापूरचे पोलीस कर्मचारी विनोद रासकर, लक्ष्मण सूर्यवंशी, होमगार्ड गणेश वडवे, भारत लोखंडे, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ड्रोन सर्वेअर संकेत बाबर यांनी या कारवाईत भाग घेतला.
हे सुद्धा वाचा : कराड हादरलं! प्रेमप्रकरणातून महिलेवर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…
जिल्ह्यातील वाळू माफीयांचे धाबे दणाणले
इंदापूर तालुक्यातील माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे पाठलाग करुन या पथकाने वाळू माफियांच्या १३ बोटीं पकडून बुडवून नष्ट केल्या. माळवाडी जॅकवेल जवळ तीन सक्शन बोटी पकडून त्यांच्यावर कारवाई केली. इंदापूरचे तहसीलदार म्हणून दीर्घकाळ काम पाहिलेले व वाळू माफियांवरील धडक कारवाईमुळे परिचित असणाऱ्या श्रीकांत पाटील यांच्या या कारवाईतील सहभागामुळे दोन्ही जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे अक्षरशः दणाणले आहेत.