Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; नवी मुंबईत पुनर्विकासासाठी ४ एफएसआयचा मार्ग खुला

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील क्लस्टर पुनर्विकासाला गती मिळाली असून, आता चार एफएसआयचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2025 | 07:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई/ सिद्धेश प्रधान : नवी मुंबई – शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे क्लस्टर / समुह पुनर्विकासाला आता गती मिळाली आहे. त्यामुळे आता तीन ऐवजी चार एफएसआय उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाल्यामुळे रहिवाश्यांना अधिक मोठी घरे मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयाला हिरवा कंदील दाखवला असल्याने सिडकोच्या धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील तीन दशकांपासून नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न विविध कारणांमुळे रखडून पडलेला आहे. कधी पर्यावरण ना हरकत दाखला, तर कधी भूखंडाचे कमी क्षेत्रफळ यामुळे पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळत नव्हती. या समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर हे सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत होते.त्यानुसार क्लस्टर पुनर्विकासाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.

नवी मुंबईचा पुनर्विकास वेग पकडणार

नवी मुंबई पालिका हद्दीत नागरी पुनरुत्थानाच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे. वाशी सेक्टर ९ मधील मे.जॅप्स को.ऑप.हौ.सो.असोसिएशन लि. व मे.नक्षत्र को.ऑप.हौ.सो. असोसिएशन लि.या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पालिकेने अधिसूचना जारी केली आहे.याच धर्तीवर आता वाशी,कोपरखैरणे,नेरूळ, घणसोली आदी भागातील १० हजार चौ.मी.पेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि १८ मी. रुंद जोडरस्ता असणाऱ्या सिडको निर्मित धोकादायक इमारतींच्या समूह पुनर्विकासाला चालना मिळणार आहे.

….. त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा

नवी मुंबईतील लोकनेत्यांनी जर कुणी चार एफ एसआय आणून दाखवला तर मी राजकारणातून संन्यास घेईन अशी वल्गना केली होती. शिवसेनेने आता चार एफएसआयचा मार्ग मोकळा केला असल्याने या लोकनेत्यांनी आता राजकारणातून संन्यास घ्यावा तसेच नगरविकास खात्यावर सतत टीका करण्यापेक्षा नवी मुंबईच्या हिताची कामे करावीत, असं बेलापुर विधानसभा क्षेत्र शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सांगितलं आहे.

महानगरपालिकेने १० ऑगस्ट २०२२ रोजी प्रारुप विकास योजना प्रसिध्द केली होती. त्यानंतर जनतेकडून हरकती व सूचना मागवून बदल करण्यात आले. ते ८ जानेवारी २०२५ रोजी शासनास सादर करण्यात आले होते. शासनाकडून २ डिसेंबर २०२० रोजी मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नुसार, नागरी पुनरुत्थान योजनेसाठी विनियम १४.८ लागू करण्यात आले आहेत. २ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत यूआरपी अधिसूचित करण्यास मान्यता देण्यात आली होती.

नवी मुंबईतील रहिवाश्यांची घरे खूप लहान आहेत अशी तक्रार होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सदरची अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्याचा लाभ वाशीसह नेरूळ,कोपरखैरणे,घणसोली आदी परिसरात धोकादायक इमारतींमध्ये होणार आहे.  रहिवाश्यांसाठी ही  दिलासादायक बाब आहे असं  ठाणे लोकसभा मतदार संघ खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे.

Web Title: Naresh mhaske and shivsena mahayuti shiv senas pursuit is successful 4 fsis open for redevelopment in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 07:16 PM

Topics:  

  • BJP Shivsena Mahayuti
  • Naresh Mhaske
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
1

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद
2

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकाऱ्यांची बदली
3

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकाऱ्यांची बदली

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा
4

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.