Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

नेरूळ सेक्टर 28 येथील रेल्वे पटरीजवळ भंगार विक्रीच्या नावाखाली अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी मोठी कारवाई केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 12:11 PM
Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त
Follow Us
Close
Follow Us:
  • भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यवसाय
  • पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त
 नवी मुंबई/सावन वैश्य : नेरूळ सेक्टर 28 येथील रेल्वे पटरीजवळ भंगार विक्रीच्या नावाखाली अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी मोठी कारवाई केली. यात पोलीसांनी , 7 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 43.6 ग्रॅम हिरोईन तसेच 26 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

नवी मुंबई परिसरात अनधिकृत झोपड्या मोठ्याप्रमाणात आहेत. विशेषतः रेल्वे पटरी च्या लगत मोठ्याप्रमाणावर अनधिकृत झोपड्या पहायला मिळतात. या झोपड्यांचं जाळ एवढं दाट आहे. की त्यामध्ये काय चाललंय हे बाहेरून अंदाज लावण कठीण आहे. त्यामुळे या झोपडपट्टीत मोठ्याप्रमाणात अमली पदार्थची तस्करी तसेच विक्री मोठ्या प्रमाणात होतं असलेली पहायला मिळत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने नेरुळ सेक्टर 28 मधील रेल्वे पटरी जवळील भंगार च्या दुकानावर कारवाई करून सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 43.6 ग्रॅम हिरोईन तसेच 26 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भंगाराच्या दुकानात देखील अमली पदार्थांची विक्री मोठ्याप्रमाणात होत असल्याच्या शंका निर्माण झाल्या आहेत.

सदरच्या भंगार दुकानात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर नेरूळ पोलीस ठाण्याच्या मदतीने बुधवारी दुपारी सुमारे 12.30 वाजता ही धडक कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे अधिकारी संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलीस अधिकारी व 15 पुरुष व महिला पोलीस अंमलदारांच्या पथकाने आरोपींच्या राहत्या घरी तसेच भंगार दुकानावर छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आल्याने सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध NDPS (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या गुन्ह्यात राकेश वाघरी, राजेंद्र काळे,अनिता पवार, राजू राठोड, शिवराज लक्ष्मण पवार, कमळाबाई राठोड, सुमन राठोड, या 7 जणांना पोलिसांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू बाबू राठोड याचा पूर्व गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात यापूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद असून, भादवि व नव्या BNS अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या टोळीत सहभागी असलेले आणखी दोन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

भंगार व्यवसायाच्या आडून अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी भाज्यांचा व्यवसाय, टपरी चालक, अशा स्वरूपाच्या आडोशाखालीही ड्रग्स विक्रीचे प्रकार समोर आले होते. मात्र, सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे पोलिसांचे गुप्तचर जाळे अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. “

भारतात परत येईपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही…”, मुंबई उच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला फटकारले

सदर आरोपी राजू राठोड याचे भंगार दुकान अनधिकृत जागेत सुरू असल्याचेही उघड झाले आहे. त्या अनुषंगाने संबंधित अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ कारवाई करून तेथील अनधिकृत भंगार दुकान जमीनदोस्त केले असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. या कारवाईमुळे नेरूळ परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, पुढील तपासात आणखी धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अश्या प्रकारचे अनधिकृत भंगार माफीयांचा मोठ्याप्रमाणात सुलसुळाट सुरु आहे. अनेकदा यांच्यात भंगार उचलण्यावरून वादविवाद देखील झालेत. हे वाद एवढे विकोपाला गेले होते की एकमेकांचे रक्त देखील या भंगार माफियांनी सांडले होते. मात्र आता भंगार दुकानात अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती समोर आल्याने, भंगार माफियांचे वाद हे नेमके भंगार वेचण्यावरून व्हायचे की अमली पदार्थाच्या तस्करी वरून व्हायचे, हा प्रश्न नव्यावे उभा राहिला आहे.

“भारतात परत येईपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही…”, मुंबई उच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला फटकारले

 

Web Title: Drug in the name of junk shop in nerul 7 accused arrested police seize marijuana worth rs 22 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • crime news
  • Narcotest
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या! दीपक साकोरे यांना पदोन्नती देत सह पोलिस आयुक्त पदी वर्णी
1

नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या! दीपक साकोरे यांना पदोन्नती देत सह पोलिस आयुक्त पदी वर्णी

Navi Mumbai Cidco : नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर; मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासनाचा मोठा निर्णय
2

Navi Mumbai Cidco : नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर; मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासनाचा मोठा निर्णय

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण
3

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण

शिलाई मशिन, योजनेतून रोख 15 हजार देतो म्हणाला अन् 64 महिलांना गंडा घातला; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
4

शिलाई मशिन, योजनेतून रोख 15 हजार देतो म्हणाला अन् 64 महिलांना गंडा घातला; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.