Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये 200 फूट खोल दरीत कोसळून टँकरचा भीषण अपघात; 5 ठार, 4 गंभीर जखमी

नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाट परिसरात 200 फूट खोल दरीत दुधाचा टँकर कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी बचाव कार्य सुरु केलं. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2024 | 01:31 PM
पर्यटकांच्या बसला अपघात

पर्यटकांच्या बसला अपघात

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दुधाचा टँकर 200 फुट खोल दरीत कोसळून हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगतिलं जात आहे. नवीन कसारा घाटाजवळ हा अपघात झाल्याची माहीती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत तात्काळ बचावकार्य सुरु केलं. मात्र मुसळधार पावसामुळे बचवा कार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

हेदेखील वाचा- बेळणे चोरी प्रकरणामधील मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक; पोलीस पथकाची धडक कारवाई

नाशिकमध्ये दुधाचा टँकर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नवीन कसारा घाटाजवळ हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा टँकर सिन्नरहून मुंबईच्या दिशेने जात होता. मात्र हा टँकर नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाट परिसरात आला असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा टँकर दरीत कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरु केलं. मात्र परिसरात मुसळधार पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आपत्ती व्यवस्थापन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या साहाय्याने खाली उतरून 4 जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी जखमींना इगतपुरी व कसारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेदेखील वाचा- धक्कादायक! लसणाच्या नावाखाली विकल्या जात आहेत सिमेंटच्या पाकळ्या; अकोल्यामधील घटना

या अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. अक्षय विजय घुगे (वय 30 वर्षे), श्लोक जायभाय (वय 5 वर्षे), अनिकेत वाघ (वय 21 वर्षे), मंगेश वाघ (वय 50 वर्षे) अशी जखमींची नावं आहेत. मृतांमध्ये विजय घुगे (वय 60 वर्षे रा. निमोण तालुका संगमनेर), आरती जायभाय (वय 31 वर्षे रा. नालासोपारा), सार्थक वाघ (वय 20 वर्षे रा. निहाल तालुका सिन्नर), रामदास दराडे (वय 50 वर्षे), योगेश आढाव राहुरी यांचा समावेश आहे. या अपघतामुळे सर्वत्र हळहल व्यक्त केली जात आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्गचे डीवायएसपी प्रदीप मैराळे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव आणि महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाट परिसरात एका दुधाच्या टँकरचा भीषण अपघात झाला. टँकर 200 फूट खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे..

Web Title: Nashik news tanker falling into 200 feet deep ravine in nashik 5 people lost their lives 4 seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…
1

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर
2

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक
3

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक

Nashik News : अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल
4

Nashik News : अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.