
सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार (फोटो सौजन्य-ChatGPT)
या सोडतीमध्ये नाशिक शहर परिसरातील पाथर्डी शिवार, म्हसरूळ शिवार, मखमलाबाद शिवार, चुंचाळे शिवार, आडगाव शिवार, सातपूर शिवार तसेच अहिल्यानगर येथील म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील सदनिकांचा समावेश होता.
अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ
म्हाडाच्या माहितीनुसार, ३३३ सदनिकांच्या सोडतीसाठी एकूण ४९३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी अनामत रकमेसह ३४१ अर्ज प्राप्त झाले होते. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली. सोडतीच्या वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या विजेत्या अर्जदारांचा सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी गेल्या दीड वर्षात नाशिक मंडळाने संगणकीय सोडतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
आजच्या सोडतीत घर मिळू न शकलेल्या अर्जदारांनी निराश होऊ नये, असे आवाहनही रंजन ठाकरे यांनी केले. आगामी काळात नाशिक मंडळातर्फे विविध प्रकल्पांतील सदनिकांच्या विक्रीसाठी अशाच प्रकारच्या आणखी संगणकीय सोडती काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे इच्छुकांनी भविष्यातील सोडतींमध्ये पुन्हा सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
अर्जदारांना सोडतीसाठी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याची आवश्यकता भासू नये आणि संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या पाहता यावी यासाठी म्हाडाने सोडतीचे थेट प्रक्षेपण आपल्या अधिकृत YouTube आणि Facebook चॅनेलवर केले. संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पारदर्शकता राखण्यासोबतच सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर म्हाडाच्या नाशिक मंडळाचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भविष्यात आणखी सदनिका सोडतीसाठी उपलब्ध होणार असल्याने नाशिक आणि परिसरातील घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना पुढील सोडतींचीही संधी मिळणार आहे.