Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Temple Threat : नाशिकमधील मंदिरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या; भाविकांनी घाबरू नये, कालामंदीर पुजाऱ्यांचे आवाहन

Nashik Temple Threat : नाशिकमधील प्रमुख मंदिरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्याने चिंता वाढली. कालाराम मंदिराचे पुजारी धनंजय आनंद यांनी भाविकांना न घाबरता दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 09, 2026 | 06:49 PM
Nashik Temple Threat : नाशिकमधील मंदिरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या; भाविकांनी घाबरू नये, कालामंदीर पुजाऱ्यांचे आवाहन

Nashik Temple Threat : नाशिकमधील मंदिरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या; भाविकांनी घाबरू नये, कालामंदीर पुजाऱ्यांचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • पोलिसांसह जिल्हा प्रशासन सतर्क
  • नाशिक पोलिसांचे परिस्थितीवर लक्ष
  • भाविकांना निर्भयपणे दर्शन घेण्याचे आवाहन
 

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे आणि देवस्थानांना नुकसान पोहोचवण्यासह बॉम्बने उडवण्याच्या धमक्या (Nashik Temple Threat ) मिळाल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री कालाराम मंदिराचे पुजारी धनंजय आनंद यांनी भाविकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व मंदिरांमध्ये विशेष सतर्कता बाळगली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

धनंजय आनंद यांनी एका वृत्तसस्थेशी संवाद साधला. ते म्हणाले की, नाशिकमधील काही महत्त्वाच्या मंदिरांना आणि देवस्थानांना धमक्या मिळाल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. त्यामुळे भाविकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मंदिरांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

नाशिक पोलिसांचे परिस्थितीवर लक्ष

नाशिकचे संपूर्ण पोलीस आणि जिल्हा प्रशासन या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. पोलीस पथकांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात असून मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Bus Accident: “पिशवीत सापडलेल्या टाचण्या, लिंबू अन् सिमकार्ड…” नाशिकच्या द्वारका चौकातील काळजाचा ठोका चुकवणारा अपघात…

मंदिर प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय

नाशिक पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि मंदिरांचे व्यवस्थापन एकत्रितपणे काम करत आहेत. भाविकांना कोणतीही भीती न बाळगता दर्शन घेता यावे, यासाठी सर्व मंदिरांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मंदिर परिसरातही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुजारी धनंजय आनंद यांनी दिली.

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!

भाविकांना निर्भयपणे दर्शन घेण्याचे आवाहन

भाविकांनी मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. उत्साहाने आणि आनंदाने मंदिरांमध्ये दर्शनासाठी यावे, असे आवाहन धनंजय आनंद यांनी केले. सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढते. त्यामुळे सर्वांनी शांतता आणि शिस्त राखून दर्शन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर व्यवस्थापन आणि प्रशासन सातत्याने समन्वय साधून काम करत आहे. भाविकांच्या सेवेसाठी मंदिर प्रशासन पूर्णपणे उपलब्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नाशिकमधील मंदिरांना कोणत्या प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत?

    Ans: नाशिकमधील काही प्रमुख मंदिरांना नुकसान पोहोचवण्याच्या आणि बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

  • Que: भाविकांना कोणी आवाहन केले आहे?

    Ans: श्री कालाराम मंदिराचे पुजारी धनंजय आनंद यांनी भाविकांना घाबरू नये, असे आवाहन केले आहे.

  • Que: मंदिरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत?

    Ans: मंदिर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीस पथके सातत्याने देखरेख करत आहेत.

Web Title: Nashik temple threat kalaram temple priest appeal rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Bomb threat
  • kalaram temple
  • Nashik

संबंधित बातम्या

Big Breaking: मोठी बातमी! मुंबईत खळबळ; High Court , जलसा अन्…; बॉम्बने उडवण्याची धमकी
1

Big Breaking: मोठी बातमी! मुंबईत खळबळ; High Court , जलसा अन्…; बॉम्बने उडवण्याची धमकी

Cannabis Cultivation : तोपर्यंत आम्हाला गांज्याची शेती करू द्या, नाशिकच्या शेतकऱ्याची थेट राष्ट्रपतींकडे मागणी
2

Cannabis Cultivation : तोपर्यंत आम्हाला गांज्याची शेती करू द्या, नाशिकच्या शेतकऱ्याची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.