Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cannabis Cultivation : तोपर्यंत आम्हाला गांज्याची शेती करू द्या, नाशिकच्या शेतकऱ्याची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

Cannabis Cultivation : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शेतकरी विजय शिंदे यांनी शेतीतील आर्थिक संकटाचा दाखला देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे गांजा आणि खसखस लागवडीला परवानगी देण्याची मागणी केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 03, 2026 | 02:40 PM
Cannabis Cultivation : आम्हाला तोपर्यंत गांज्याची शेती करू द्या, नाशिकच्या शेतकऱ्याची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

Cannabis Cultivation : आम्हाला तोपर्यंत गांज्याची शेती करू द्या, नाशिकच्या शेतकऱ्याची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

Follow Us
Follow Us:
  • कुंभमेळ्यापर्यंत शेती करू देण्याची मागणी
  • राजस्थान, हरियाणात गांजा शेतीला मान्यता
  • राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान निवेदन
 

गांजाची लागवड करणं महाराष्ट्रात एक गुन्हा आहे. पण नाशिकच्या एका शेतकऱ्यानं थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपल्याला गांजा व खसखसीची शेती (Cannabis Cultivation) करू द्यावी अशी मागणी केली आहे. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या संदर्भ देत या शेतकऱ्यानं केलेल्या मागणीनंतर एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील सायाळे गावचे शेतकरी विजय रामनाथ शिंदे यांनी या संदर्भात राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. गांजाची वनस्पती ही तशी औषधीच, पण त्याचे काही चांगले व काही वाईट गुण आहेत. म्हणून राज्यात त्याच्या लागवडीला परवानगी नाही. दरम्यान, शिंदे यांच्या या अनोख्या मागणीची सध्या नाशिकसह राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

..मग महाराष्ट्रात परवानगी का नाही

दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शिंदे यांनी अनेक बाबींना हात घातला. यावर्षी नाशकात कुंभमेळा होणार असून येथे लाखोंच्या संख्येने सांधू येणार आहेत. या साधूंना लागणारा गांजा बाहेरील राज्यातून येतो. सध्या राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता, गांजा व खसखसची तात्पुरत्या स्वरुपात का होईना आम्हाला लागवड करू द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसंच काही राज्यांमध्ये गांजा शेतीला अटीशर्थींसह परवानगी देण्यात येते. मग महाराष्ट्रात का नाही? तसंच मी जर काही चुकीचं म्हणत असेन तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असंही शेतकरी शिंदे यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

Simhastha Kumbh Mela : त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

शेतीतील आर्थिक अडचणींचा दाखला

विजय शिंदे यांनी निवेदनातून शेतीसमोरील आर्थिक अडचणी मांडल्या आहेत. यंदा झालेला पाऊस, शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पर्यायी पिकांचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी गांजा आणि खसखस लागवडीसाठी स्थानिक शेतकऱ्यांना परवानगी देण्याची मागणी केली आहे.

Navrashtra Impact: अहिल्यानगर वनविभागाचा निर्लज्ज कारभार: पोस्टरवर ‘झाड लावा’ चा संदेश, प्रत्यक्षात हजारो झाडांची कत्तल

सिन्नरमध्ये यापूर्वीही अशी मागणी

गांजा लागवडीसाठी परवानगी मागण्याची सिन्नर तालुक्यातील ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी याच वर्षी मे महिन्यात शेतकरी सुनील उकिर्डे यांनीही प्रशासनाकडे अशी मागणी केली होती. कांद्याला अवघा 12.35 रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत गांजा लागवडीची परवानगी मागितली होती.

राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान निवेदन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाशिक दौऱ्यावर आल्या असताना विजय शिंदे यांनी त्यांच्याकडे हे निवेदन सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदर्भ देत त्यांनी आपल्या मागणीचे समर्थन केल्याचीही चर्चा आहे. आता या मागणीची शासनाकडून काय दखल घेतली जाते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गांजा आणि खसखस लागवडीची परवानगी कोणी मागितली आहे?

    Ans: सिन्नर तालुक्यातील सायाळे गावचे शेतकरी विजय रामनाथ शिंदे यांनी ही मागणी केली आहे.

  • Que: शेतकऱ्याने राष्ट्रपतींकडे ही मागणी का केली?

    Ans: शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव, पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

  • Que: भारतात गांजा आणि खसखस लागवडीला परवानगी आहे का?

    Ans: भारतामध्ये गांजाच्या लागवडीवर कायदेशीर निर्बंध आहेत. मात्र, वैद्यकीय आणि वैज्ञानिक कारणांसाठी नियंत्रित परवानगी दिली जाऊ शकते. अफूच्या लागवडीसाठीही केंद्र सरकारच्या नियमानुसार परवाना आवश्यक असतो.

Web Title: Cannabis cultivation nashik farmer demands permission for poppy rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • cannabis seized
  • Droupadi Murmu
  • Nashik

संबंधित बातम्या

Washim Ganja Farming Case: ७० वर्षीय शेतकऱ्याच्या शेतात सुरू होता अवैध धंदा; पोलिसांनी टाकली धाड आणि…
1

Washim Ganja Farming Case: ७० वर्षीय शेतकऱ्याच्या शेतात सुरू होता अवैध धंदा; पोलिसांनी टाकली धाड आणि…

Nepal Cannabis : तब्बल 50 वर्षांनंतर नेपाळमध्ये गांजाच्या शेतीचा मार्ग मोकळा? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
2

Nepal Cannabis : तब्बल 50 वर्षांनंतर नेपाळमध्ये गांजाच्या शेतीचा मार्ग मोकळा? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश

Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी
3

Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी

Nashik Kumbh Mela: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व काय? महंत नरसिंह कृपादास यांनी सांगितले गोदावरी सेवेचे महत्त्व
4

Nashik Kumbh Mela: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व काय? महंत नरसिंह कृपादास यांनी सांगितले गोदावरी सेवेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.