Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वी नाशिकमध्ये दगडफेक; २२ पोलीस जखमी

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आज होणार होती. मात्र, काल रात्रीच या कारवाईबाबत अफवा पसरल्यानंतर काही नागरिकांनी काठे गल्ली गाठली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 16, 2025 | 10:45 AM
Nashik News: अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वी नाशिकमध्ये दगडफेक; २२ पोलीस जखमी
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक:   नाशिकच्या काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीच काल (१५ एप्रिल) रात्री उशिरा या भागात जोरदार राडा झाला. दर्गा हटवण्याच्या कारवाईपूर्वीच दर्ग्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण अचानक त्या ठिकाणी मोठा जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत २२ पोलिस जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. पण पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस बंदोबस्तात पहाटेपासून दर्गा हटवण्याचे काम सुरू आहे. काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेला अनधिकृत दर्गा आज (16 एप्रिल)  हटवण्याची कारवाई होणार होती. मात्र, काल रात्रीच या कारवाईबाबत अफवा पसरल्यानंतर काही नागरिकांनी काठे गल्ली गाठली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जमाव आणखी आक्रमक झाला. दर्गा हटवण्यापूर्वीच अफवा पसरवण्यात आल्याने परिस्थिती चिघळली. घटनास्थळी आधीच ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी ४०० पेक्षा अधिक लोकांचा जमाव त्या ठिकाणी एकत्र झाला. जमावाने आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. या हिंसाचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत.

मोठी बातमी ! साताऱ्यातील ‘हा’ बडा नेता करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत दर्गा हटवण्याच्या कारवाईदरम्यान काल रात्री तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन सहाय्यक पोलिस आयुक्त आणि २० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे.

दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या आठपेक्षा अधिक लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस सातत्याने प्रयत्नशील आहेत. या घटनेनंतर काठे गल्ली परिसरातील वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LSG vs CSK : ‘कर्णधाराच्या मनात खास…’, फिरकीपटू रवी बिश्नोईकडून ऋषभ पंतचा बचाव, सीएसकेविरुद्धच्या

दर्गा हटवण्यासाठी नोटीस देऊनही कारवाई टाळली गेली होती

नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल रोजी या अनधिकृत दर्ग्याला नोटीस बजावली होती. स्वतःहून हे बांधकाम हटवण्याची सूचना देण्यात आली होती, अन्यथा महापालिकेकडून तोडकाम करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र, मुदत संपल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे १५ एप्रिलपासून पालिकेकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू असून, दर्गा परिसराच्या १०० मीटर परिसरात बॅरिकेडिंग लावण्यात आले आहेत.  कोणालाही आत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. दुपारपर्यंत अनधिकृत दर्गा पूर्णतः हटवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: 22 policemen injured in stone pelting in nashik before removal of unauthorized dargah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • Nashik News
  • Nashik Police

संबंधित बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यात दररोज मिळणार 940 दशलक्ष लिटर पाणी; साधूग्राममध्ये दहा लाख साधू-महंत राहणार?
1

सिंहस्थ कुंभमेळ्यात दररोज मिळणार 940 दशलक्ष लिटर पाणी; साधूग्राममध्ये दहा लाख साधू-महंत राहणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.