नाशिककरांसाठी मोठी बातमी! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांसाठी ३७०० कोटींचा बजेट
यंदा नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार असून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यसकारनेही तयारी सुरू केली असून रस्त्यांच्या विकासासाठी मोठी तरतूद केली आहे. नाशिकमधील रस्त्यासाठी ३७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
घोटी-त्रंबकेश्वर-जवाहर हा रस्ता मुंबईला जोडतो. मुंबईतील लोकांना घोटीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचता येईल यासाठी रस्ता चारपदरी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाटी ३७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नाशिक ते सिन्नरच्या देखील विस्तार केला जाणार आहे. नाशिककडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचांही विस्तार केला जाणार आहे’, असंही त्यांनी सांगितलं.
‘नाशिक रिंग रोडचं काम देखील लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दीड दोन वर्षात सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. जळगाव ते संभाजीनगर जोडण्यासाठी देखील पर्याय शोधण्यात आला आहे. जेणेकरून मुंबईला पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार आहे’, असं देखील महाजन यांनी म्हटलं आहे.
नाशिक आणि राडगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापलं होतं. मात्र सध्या हा विषय थंडावल्याचं पहायला मिळत आहे. पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी तिन्ही घटक पक्षांमध्ये पदाला कमालीची चढाओढ सुरू झाली होती. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे या तिघांनीही फिल्डिंग लावली होती. पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालिकमंत्रिपदाचं महत्त्वही आता कमी झाल्यासारखं वाटत आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यात आजच्या घडीला चार मंत्री आहेत. मात्र, पालकमंत्री नाही अशी अवस्था आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौरा केला. या दौऱ्यात सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. यावेळी नाशिक पालकमंत्री पदाच्या घोषणेचे काय याची विचारणा झाली.