नाशिक : आज रविवारी मराठी राजभाषा दिन साजरा होत असताना मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता अनेक कलाकार तसेच राज्य सरकारने पाठपुरावा करून देखील अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
येवला दौऱ्यावर आलेले येवल्या भुजबळ म्हणाले की, गेल्या सात वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा भारत सरकारकडून देण्यात आला नाही आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळण्यासाठी ज्या ज्या अटींची पुर्तता करावी लागते ती मराठी भाषेने पुर्ण केली आहे. तेलंगणा, केरळ, या राज्यातील भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना तर या समृध्द भाषेला अभिजात भाषेला दर्जा देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.
[read_also content=”जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : विनयभंग प्रकरणी दोन आरोपींना पाच वर्षांचा सश्रम कारावास https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/district-sessions-court-verdict-two-accused-in-molestation-case-sentenced-to-five-years-rigorous-imprisonment-nraa-245985.html”]