Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: धक्कादायक! 12 वर्षांपासून आधार कार्डसाठी ‘तिचा’ वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील अनुष्का गेल्या दोन वर्षांपासून आधार कार्डासाठी धडपड करतेय. या प्रकरणातून ग्रामीण भागातील सरकारी सेवांतील विलंब आणि नागरिकांच्या अडचणींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 03, 2026 | 01:00 PM
धक्कादायक! १२ वर्षांपासून आधार कार्डसाठी 'तिचा' वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा

धक्कादायक! १२ वर्षांपासून आधार कार्डसाठी 'तिचा' वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • आधारकार्डसाठी दिला आत्महत्येचा इशारा
  • १२ वर्षांपासून आधार कार्डसाठी ‘ती’ सहन करतेय वनवास
  • आधीचे आधार तांत्रिक कारणास्तव कार्ड कार्यान्वित होत नाही
चांदवड : माझं आधार माझी ओळख असं सरकार म्हणत असलं, तरी चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील एका १५ वर्षीय विद्यार्थिनीला मात्र याच ओळखीसाठी मागील १२ वर्षापासून वनवन फिरावे लागत आहे. वारंवार प्रयत्न करूनही आधार कार्ड मिळत नसल्याने वैतागलेल्या इयत्ता नववीतील अनुष्का आप्पासाहेब शिरसाठ या विद्यार्थिनीने आता थेट प्रशासनाला आत्महत्येचा इशारा दिला आहे.

अनुष्काचे वय १५ वर्षे असून ती सध्या ९ वीत शिकत आहे. तिच्याकडे पूर्वी आधार कार्ड होते, मात्र तांत्रिक कारणास्तव ते ‘कार्यान्वित’ नसल्याचे सांगण्यात आले. पुढील वर्षी दहावीचे वर्ष असल्याने शाळेकडून वारंवार आधार कार्डची मागणी होत आहे. आधार नसल्यास तिला बोर्डाची परीक्षा, शासकीय योजनांचा लाभ, रेशन आणि बँक खाते यांपासून वंचित राहावे लागणार आहे.

Water Shortage : धोक्याची घंटा! गावाची लोकसंख्या 7830 आणि केवळ 5 टँकरने पाणीपुरवठा, अवकाळीच्या तडाख्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट

गेल्या १२ वर्षांपासून आधार कार्डसाठी अनुष्का सहन करतेय वनवास

पालकांच्या आरोपानुसार, अनुष्का गेल्या १२ वर्षांपासून आधार कार्डसाठी पाठपुरावा करत आहे. चांदवडमधील जवळपास सर्व आधार केंद्रांवर चकरा मारल्या. प्रत्येक वेळी बायोमेट्रिक्स घेतले जातात आणि १५ दिवसात कार्ड येईल असे सांगितले जाते, मात्र कार्ड येत नाही. याप्रकरणी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अगदी मुंबईतील आधार मुख्य कार्यालयाकडेही धाव घेतली, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अनुष्का त्रासली असून, प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थिनीला आत्महत्येचा इशारा द्यावा लागणे, प्रशासनाचे अपयश असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम

अनुष्काने जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारयांना दिलेल्या निवेदनात आपली व्यथा मांडली आहे. तिने आपल्या अर्जासोबत जन्म दाखला आणि जुन्या आधार कार्डची प्रत जोडली असून, येत्या ८ दिवसात न्याय देण्याची मागणी केली आहे. एका बाजूला सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चा नारा देत असताना, केवळ एका तांत्रिक कागदपत्रामुळे एका मुलीचे शिक्षण धोक्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

मी स्त्री शिक्षणाच्या जाहिराती पाहते, पण जर मला आधार कार्डविना शिक्षणाचा आणि जगण्याचा अधिकारच मिळत नसेल, तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया देवरगावची विद्यार्थिनी अनुष्का शिरसाठ हिने दिली.

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित

Web Title: Nashik chandwad taluka girl anushka struggling for aadhaar card since 12 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • aadhaar card
  • Nashik

संबंधित बातम्या

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण
1

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
2

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Nashik Earthquake: नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
3

Nashik Earthquake: नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात
4

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.