Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Slab Collapse: “जेवणानंतर विश्रांती घेत असताना भीषण अपघात; नाशिकमध्ये ‘साई निवारा’चा स्लॅब कोसळून १५ ते १७ भाविक गंभीर जखमी!”

Slab Collapse: मध्यरात्री अनर्थ! इगतपुरीच्या 'साई निवारात' शिर्डीला निघालेल्या भक्तांवर कोसळला स्लॅब; शहापूरच्या १५ ते १७ भाविक गंभीर जखमी! स्लॅबचे गर्डर अंगावर पडल्याने उडाली तारांबळ... तातडीने कोण धावले मदतीसाठी?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 18, 2026 | 11:44 AM
Slab Collapse: "जेवणानंतर विश्रांती घेत असताना भीषण अपघात; नाशिकमध्ये 'साई निवारा'चा स्लॅब कोसळून १५ ते १७ भाविक गंभीर जखमी!"

Slab Collapse: "जेवणानंतर विश्रांती घेत असताना भीषण अपघात; नाशिकमध्ये 'साई निवारा'चा स्लॅब कोसळून १५ ते १७ भाविक गंभीर जखमी!"

Follow Us
Follow Us:
  • इगतपुरीतील ‘साई निवारा’ इमारतीचा स्लॅब मध्यरात्री कोसळला
  • शिर्डीला निघालेले शहापूरचे साई भक्त विश्रांती घेत असताना स्लॅब अंगावर पडला
  • अपघातात १५ ते १७ भाविक जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले
Slab Collapse: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इगतपुरी येथील ‘साई निवारा’ येथे रात्रीच्या सुमारास अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत शिर्डीच्या दर्शनासाठी निघालेले शहापूर परिसरातील अनेक साई भक्त गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

स्लॅब कोसळल्याने मोठा आवाज, परिसरात भीतीचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीच्या दर्शनासाठी निघालेले शहापूर परिसरातील काही साई भक्त इगतपुरी येथील ‘साई निवारा’ येथे मुक्कामाला थांबले होते. दिवसभराचा प्रवास आणि जेवण आटपून हे सर्वजण रात्री निवाऱ्यात शांतपणे विश्रांती घेत होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या या दुर्घटनेत निवाऱ्याच्या स्लॅबचे गर्डर आणि लोखंडी-सिमेंटच्या फरशा थेट खाली झोपलेल्या भाविकांच्या अंगावर कोसळल्या. या अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच तारांबळ उडाली. स्लॅब कोसळण्याच्या मोठ्या आवाजामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.

हेही वाचा: Mukesh Ambani: पृथ्वी कमी पडली आता अंतराळावर कब्जा करण्याच्या तयारीत अंबानी! 1600 सॅटेलाईटचा मोठा खेळ

१५ ते १७ साई भक्त गंभीर जखमी; प्रशासनाकडून तपास सुरू

या दुर्दैवी अपघातात १५ ते १७ साई भक्त गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटना समजताच स्थानिक नगरसेवक राज जावरे, पोलीस यंत्रणा आणि महामार्ग टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मदतीसाठी पुढे येत या सर्वांनी मिळून सर्व जखमी साई भक्तांना तातडीने इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे विश्रांतीसाठी थांबलेल्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्घटना नेमकी कुठे घडली आहे?

    Ans: ही दुर्घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील 'साई निवारा' येथे घडली आहे.

  • Que: जखमी साई भक्त कोठून आले होते आणि ते तिथे कशासाठी थांबले होते?

    Ans: जखमी साई भक्त शहापूर परिसरातील रहिवासी असून ते शिर्डीच्या दर्शनासाठी निघाले होते आणि तिथे मुक्कामाला थांबले होते.

  • Que: या दुर्घटनेत किती साई भक्त जखमी झाले आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे?

    Ans: या दुर्घटनेत १५ ते १७ साई भक्त गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Nashik igatpuri sai nivara building slab collapse shahapur sai bhakts injured sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Nashik
  • nashik accident news
  • SAI
  • slab collapsed

संबंधित बातम्या

Theft Case: देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून तब्बल १३ लाखांचा ऐवज लंपास; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी चक्क …
1

Theft Case: देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून तब्बल १३ लाखांचा ऐवज लंपास; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी चक्क …

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.