नाशिक : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं नुकतचं निधन झालं असून वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांचाही समावेश आहे. त्यांनी अक्षरशः केळीच्या पानावर लतादीदींचे दोन वेगवेगळे चित्र आपल्या हाताच्या साह्याने रेखाटत लतादीदींना आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
[read_also content=”मुंबई, चेन्नई आणि राजस्थान चॅम्पियन होऊ शकतात, पंजाब आणि RCB सर्वात कमकुवत https://www.navarashtra.com/sports/cricket/all-teams-of-ipl-swot-analysis-mumbai-chennai-and-rajasthan-can-be-champions-punjab-and-rcb-are-the-weakest-238745.html”]
गानकोकिळा म्हणून ज्यांची ओळख सर्वदूर असलेल्या लता मंगेशकर यांना अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करत आहे. अशाच प्रकारे येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी अक्षरशः केळीच्या पानावर लतादीदींचे दोन वेगवेगळे चित्र आपल्या हाताच्या साह्याने रेखाटत लतादीदींना आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी राऊळ कुटुंबांनी या केळीच्या पानाभवती पणत्या लावून लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी या कलाकाराने लता दीदी सोबत एक कोकिळेचे देखील चित्र काढत लतादीदी गानकोकिळा असल्याचे या चित्रकाराने चित्रातून साकरले आहे.
[read_also content=”नवज्योत सिंह सिद्धू आणि विक्रम मजीठीया अमृतसरमध्ये हरणार – अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान , मोदींवरही शरसंधान https://www.navarashtra.com/assembly-election-2022/arvind-kejriwal-said-that-navjyot-singh-siddhu-and-viukram-majithia-will-be-defeated-in-amrutsar-nrsr-238733.html”]