
लग्न लागण्याआधीच नववधूचा मृत्यू
नाशिकमधील धक्कादायक घटना
शहरात व्यक्त केली जात आहे हळहळ
नाशिक: नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये एका वधूचा मृत्यू झाला आहे. लग्न लागण्याआधीच नववधूचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नववधूच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. नाशिकमधील ही घटना नेमकी काय आहे त्याबाबत जाणून घेऊयात.
नाशिक जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये लग्न सोहळा सुरू होता. वधू आणि वर तसेच दोघांचे कुटुंब अत्यंत आनंदात आणि उत्साहात होते. लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार होते. मात्र त्यांचे लग्न होणे हे नियतीला मान्य नव्हते. लग्नसोहळा सुरू होण्याआधीच काही तास नववधूचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने वधूचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये एका लग्नसोहळ्याचा उत्साह सुरू होता. दोन्ही कुटुंब आनंदात होते. थोड्याच वेळात तिथे मंगलाष्टकाच्या सुमधुर ओळी ऐकू येणार होत्या. मात्र लग्न लागण्याआधीच काही तास नववधूला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. यामुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रेयसीला डेट करण्यासाठी सरकार देतंय 31 हजार रुपये
आजच्या धावपळीच्या युगात तरुणांना आपल्या करिअर आणि कामातून प्रेमासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, जगात असा एक देश आहे जिथे सरकार तरुणांना चक्क ‘डेटिंग’ करण्यासाठी पैसे देत आहे. इतकेच नाही, तर जर त्या डेटिंगचे रूपांतर लग्नात झाले, तर जोडप्याला चक्क २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षीस रक्कम दिली जात आहे. दक्षिण कोरिया आणि चीन यांसारख्या आशियाई देशांमध्ये सध्या लोकसंख्येचे भीषण संकट ओढवले असून, ते रोखण्यासाठी या अजब योजना राबवल्या जात आहेत.
दक्षिण कोरिया हा प्रगत देश असला तरी सध्या एका गंभीर सामाजिक संकटाचा सामना करत आहे. येथील तरुण कामात इतके व्यग्र आहेत की त्यांना वैयक्तिक आयुष्यासाठी वेळच उरत नाही. वाढती महागाई आणि घरांच्या किंमतींमुळे तरुण लग्नापासून आणि मुले जन्माला घालण्यापासून दूर पळत आहेत. याचा परिणाम म्हणून देशाचा जन्मदर ऐतिहासिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे. हे संकट दूर करण्यासाठी दक्षिण कोरिया सरकारने तरुणांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा एखादे जोडपे डेटवर जाते, तेव्हा सरकार खर्चासाठी $350 (अंदाजे ३१,००० रुपये) देते. जोडप्यांनी एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवावा आणि त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचावे, हा यामागील उद्देश आहे. जर हे जोडपे लग्न करण्याचा निर्णय घेते, तर त्यांना २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून ते आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय करू शकतील.