Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहूड घाटात बर्निंग एसटी बसचा थरार; काही क्षणातच बस जळून खाक, बसमधील 52 प्रवासी…

निसर्ग लॉन्ससमोर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक एकाच मार्गाने वळविण्यात आली होती. त्यातच बसला आग लागल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे तासभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2026 | 01:35 PM
राहूड घाटात बर्निंग एसटी बसचा थरार; काही क्षणातच बस जळून खाक, बसमधील 52 प्रवासी...

राहूड घाटात बर्निंग एसटी बसचा थरार; काही क्षणातच बस जळून खाक, बसमधील 52 प्रवासी...

Follow Us
Follow Us:

चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरच्या खोकड तलावासमोरील निसर्ग लॉन्सजवळ एक दुर्घटना घडली. रेणुकादेवी मंदिर घाट उतरून चांदवड येथील निसर्ग लॉन्सजवळ शहादा-नाशिक एसटी बसला अचानक भीषण आग लागली. या आगीत बसमधील महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ५४ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र, काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

शहादा आगाराची (एमएच-१५/जेडब्ल्यू-०८९५) क्रमांकाची बस सकाळी सव्वाआठ वाजता शहादा येथून नाशिककडे जाण्यासाठी निघाली होती. दुपारी चांदवडजवळ आली असता बसच्या गिअर बॉक्सजवळ शॉर्टसर्किट झाले आणि अचानक धूर निघू लागला. बसमधील एका महिला प्रवाशाच्या हे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वाहक सचिन बंडू ननावरे यांना माहिती दिली. वाहकाने चालकाला सावध करताच चालक गोविंद किसन पाटील यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत बस तातडीने रस्त्याच्या कडेला उभी केली.

भीषण आगीत ट्रक जळून खाक, सुदैवाने चालक बचावला; हिंगोली जिल्ह्यातील घटना

दरम्यान, धुराचे लोट दिसताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व प्रवासी जीवाच्या आकांताने बसमधून खाली उतरले. प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला नाही तोच, काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढा घातला आणि काही वेळातच बस जळून खाक झाली. या बसमधून प्रवास करणारी दोंडाईचा येथील कृषी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी वैष्णवी जाधव हिच्या दोन बॅगांमधील शैक्षणिक साहित्य, नोट्स आगीत जळून खाक झाले.

वाहतूक एकाच मार्गाने वळवली

निसर्ग लॉन्ससमोर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक एकाच मार्गाने वळविण्यात आली होती. त्यातच बसला आग लागल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे तासभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती.

यापूर्वीही बसने घेतला होता पेट

दुसऱ्या एका घटनेत, पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील अष्टविनायक श्री महागणपती मंदिरासमोर एका धावत्या खाजगी बसने अचानक पेट घेतला. परंतू बसचालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविल्यामुळे बसमधील ३६ प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही बस रस्त्याच्या कडेलाच असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास दोन तास विस्काळीत झाली होती.

Web Title: St bus engulfed in flames incident in rahud ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Bus Fire
  • Maharashtra ST Buses

संबंधित बातम्या

मुंबई-पुणे मार्गावर ‘बर्निंग बस’चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग
1

मुंबई-पुणे मार्गावर ‘बर्निंग बस’चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.