राज्यात थंडी पडायला सुरूवात झाली आहे, मुंबईसह राज्याच्या इतर ठिकाणी हवेत गारवा हरवा जानवत आहे. नाशिक मध्ये पुन्हा तापमानात घसरण झाल्याने थंडीने नागरिक कुडकुडले आहेत. आज नाशिक मध्ये किमान तापमान 10.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे तर निफाड मध्ये हा तापमानाचा पारा 7.8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आहे. नागरिक थंडीने कुडकुडत असले तरीही रब्बी पिकांसाठी मात्र हे हवामान अनुकूल मानलं जात आहे.
#नाशिकचा पारा पुन्हा घसरला असून #थंडीचा कडाका वाढला आहे. मध्यंतरी १९ अंश सेल्सिअस तापमान होते मात्र आज १०.३ अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर निफडला ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ही थंडी रब्बी पिकांसाठी उपयुक्त आहे.@InfoNashik #WeatherUpdate
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 24, 2022