Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: “मंदिरात ऊर्जा नाही; रातोरात पाडून टाका…”, वैजेश्वर मंदिराबाबत कॅप्टन खरातचा अजब सल्ला

वावी येथील १२१७ सालातील यादवकालीन वैजेश्वर मंदिर पाडण्याचा ‘ऊर्जा नाही’ असा दावा करत कॅप्टन अशोककुमार खरात यांनी दिलेला सल्ला पुन्हा चर्चेत आला. ग्रामस्थ संभ्रमात पडले आणि अखेरीस या विषयाला बगल देण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 27, 2026 | 11:41 AM
"मंदिरात ऊर्जा नाही; रातोरात पाडून टाका...", वैजेश्वर मंदिराबाबत कॅप्टन खरातचा अजब सल्ला

"मंदिरात ऊर्जा नाही; रातोरात पाडून टाका...", वैजेश्वर मंदिराबाबत कॅप्टन खरातचा अजब सल्ला

Follow Us
Follow Us:
  • वैजेश्वर मंदिराबाबत कॅप्टन खरातचा अजब सल्ला
  • मंदिर रातोरात पाडून टाकून नव्याने मंदिर उभारावे
  • खरातने आपल्या ईशान्येश्वर मंदिराचे महात्म्य वाढावे
सिन्नर : वावी येथे असलेल्या सुमारे इसवी सन १२१७ सालात बांधलेल्या यादवकालीन पुरातन वैजेश्वर मंदिराबाबत भोंदू बाबा कॅप्टन अशोककुमार खरात यांनी दिलेला अजब सल्ला आता पुन्हा चर्चेत आला आहे. मंदिरातील शिवलिंग क्षीण झाले असून त्यात कोणतीही ‘ऊर्जा’ उरलेली नाही, गावासाठी हे मंदिर अरिष्ट आहे. त्यामुळे हे मंदिर रातोरात पाडून टाकून नव्याने मंदिर उभारावे, असा सल्ला त्यांनी ग्रामस्थांना दिल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सुमारे चार वर्षांपूर्वी घडल्याचे समजते. खरातने आपल्या ईशान्येश्वर मंदिराचे महात्म्य वाढावे, या कुटील हेतूनेच त्यांनी वैजेश्वर मंदिर पाडण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.

इतिहासाच्या नोंदीनुसार हे मंदिर काशी विश्वेश्वराचे स्थान मानले जाते. धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या या मंदिराला केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संरक्षण असल्याने त्यात कोणताही हस्तक्षेप केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खरात यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. वैजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मार्गदर्शन मिळावे या अपेक्षेने काही स्थानिक तरुणांनी खरात यांना बोलावले होते. मात्र त्यांनी मंदिर पाडण्याचा सल्ला दिल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आणि अखेरीस या विषयाला बगल देण्यात आली.

जग्गू, जग्गू सर्च इट’ म्हणत मोबाईल अॅपकडून उत्तर

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, कॅप्टन अशोककुमार खरात त्या वेळी मोबाईलमधील एका अॅपचा वापर करत होते, मोबाईलकडे जग्गू, जग्गू सर्व इट” अशी कमांड देत ते काही प्रश्न विचारत असत. त्यानंतर त्या अॅपमधून येणाऱ्या उत्तरांवरून मंदिराची क्षमता क्षीण झाल्याचा, तसेच शिवलिंगातील शक्ती नष्ट झाल्याचा दावा ते ग्रामस्थांसमोर करत होते. मोबाईलवरील या प्रक्रियेमुळे उपस्थित काही ग्रामस्थांचा क्षणभर या प्रकारावर विश्वासही बसला होता. मात्र नंतर ग्रामस्थानी या दाव्यांकडे दुर्लक्ष करत या विषयाला बगल दिली.

… बरे झाले नादी लागलो नाही!

ग्रामस्थांच्या मते, त्या वेळी खरात मोबाईलमधील एका अॅपद्वारे विचित्र भाषेत प्रश्न विचारत होते आणि त्यातून मिळालेल्या उत्तरांच्या आधारे मंदिर ‘गावासाठी घातक’ असल्याचा दावा करत होते. त्यांच्या या दाव्यामुळे उपस्थित लोक काही काळ गोंधळून गेले होते. त्यावेळी त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला असता तर गावातील या ऐतिहासिक मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले असते आणि कायदेशीर अडचणीही ओढवल्या असत्या, अशी चर्चा सध्या गावात रंगली आहे. ‘त्यावेळी या भानगडीत पडलो नाही, हेच बरे झाले, ‘असे म्हणत मंदिर जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Web Title: Vaijeshwar temple demolition controversy captain ashokkumar kharat strange advice vavi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
3

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.