पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळाले. त्यामध्ये शिवसेनेचे बंडापासून ते आतापर्यंतचे राष्ट्रवादीमधील उभी फूट पाहायला मिळाली आहे. भाजपसोबत महाराष्ट्रातील महत्त्वाचे पक्ष सत्तेत सामील झाल्याने भाजपचे जुने सहकारी घटक पक्ष नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अगोदरच भाजप आणि घटक पक्षांचे आमदार सत्तेत असताना, आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदारदेखील सत्तेत सामील झाल्याने वाटेकरीसुद्धा वाढल्याने भाजपच्या घटक पक्षांची चिंता वाढली. आता त्याचाच परिणाम रासपच्या रूपाने पाहायला मिळत आहे.
जनसुराज्या यात्रेच्या माध्यमातून राज्यभर प्रचार
जनसुराज्या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील सोळा मतदारसंघात पोहचलो असून राज्यासह गुजरात, बिहार, आसाममध्ये देखील यात्रा सुरू आहेत. यामाध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून राष्ट्रीय समाज पक्ष हा आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी दिली.