फोटो सौैजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या मार्केटमध्ये कार ऑफर करतात. यातही ग्राहकांकडून एसयूव्ही सेगमेंटमधील कारला चांगली मागणी मिळत असते. ग्राहकाची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये मिड साइझ एसयूव्ही ऑफर करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील मार्केटमध्ये लाँच होत आहे.
Renault देखील बाजारात तीन नवीन कार सादर करत आहे. मात्र, कंपनी लवकरच त्यांच्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात कोणत्या सेगमेंटमध्ये कोणत्या कार लाँच केल्या जाऊ शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेनॉल्ट भारतीय बाजारात तीन नवीन कार लाँच करण्याची तयारी करत आहे. मात्र, कंपनीने अद्याप या तीन कारची अधिकृत घोषणा केलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, कंपनी भारतात 3 नवीन कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कार्स मिड-साइज SUV सेगमेंट, 7-सीटर मिड-साइज SUV सेगमेंट आणि इलेक्ट्रिक हॅचबॅक सेगमेंटमध्ये सादर केल्या जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये निर्माता Kwid Electric Version लाँच करण्याची तयारी करत आहे. याशिवाय, 5-सीटर मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये Renault Duster लाँच केली जाणार आहे. तर 7-सीटर SUV पर्यायासह कंपनी भारतीय बाजारात Boreal SUV लाँच करण्याची शक्यता आहे.
Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…
अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु अंदाजानुसार जानेवारी 2026 मध्ये निर्माता आपली नवी SUV बाजारात आणेल. सर्वात आधी Renault Duster भारतात लॉन्च होण्याची शक्यता असून, त्यानंतर Electric Kwid सादर केली जाईल. त्यानंतर 2026 च्या मध्यावर Boreal SUV भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
रिपोर्ट्सनुसार, लाँच होण्यापूर्वी तिन्ही कारची भारतात टेस्टिंग होत आहेत आणि त्या भारतात अनेक वेळा दिसल्या देखील आहेत.