Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट; शिवरायांच्या मूर्तीवरुन श्रेयवाद, उद्घाटनासाठी पालिकेला मुहूर्त मिळेना

आगामी निवडणुका पाहता उद्घाटनाच्या श्रेयात शिवराय अडकल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.सकल मराठा समाज, तसेच मनसेने नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा देखील पालिकेला दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 07, 2025 | 01:15 PM
Navi Mumbai : शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट; शिवरायांच्या मूर्तीवरुन श्रेयवाद, उद्घाटनासाठी पालिकेला मुहूर्त मिळेना
Follow Us
Close
Follow Us:
  • शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
  • शिवरायांच्या मूर्तीवरुन श्रेयवाद सुरु
  • उद्घाटनासाठी पालिकेला मुहूर्त मिळेना

नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : नेरूळ सेक्टर 1 शिरवणे येथील राजीव गांधी उड्डाणपूल येथे उतरताच पूर्व बाजूस छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकाला महराजांचे नाव देण्यात आले असले तारी या चौकात कोठेही महाराजांचे अस्तित्व दिसून येत नव्हते.या चौकात येणारे नागरिक अनेकदा संभ्रमात पडून शिवाजी महाराजांची मूर्ती कोठे आहे? हे विचारताना दिसत होते. मात्र आता हा संभ्रम लवकरच दूर झाला आहे. गेली अनेक वर्ष भाजपाचे समाजसेवक देवनाथ म्हात्रे या मूर्तीसाठी पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्यातून या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसविण्यात आली आहे. चौकाची सजावट झाली आहे. पालिकेला शिवरायांच्या मूर्तीच्या उद्घाटनाचा मुहूर्त मिळेनासा झाला आहे. आगामी निवडणुका पाहता उद्घाटनाच्या श्रेयात शिवराय अडकल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.सकल मराठा समाज, तसेच मनसेने नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा देखील पालिकेला दिला आहे.

Navi Mumbai : आपत्‍कालीन सुसज्‍जता आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज; अपोलो हॉस्पिटल्‍स नवी मुंबई विमानतळावर पुरवणार आरोग्यसुविधा

नेरूळ प्रवेशद्वाराला मिळाली ओळख

सायन पनवेल महामार्गावरून नवी मुंबईत शिरण्यासाठी नेरूळ येथे एलपी चौक प्रसिद्ध आहे. या चौकातून आत येताच शिरवणे येथे डी. वाय पाटील कोलेजसमोर काही अंतरावर चौक आहे. या चौकाचे नामकरण जरी छत्रपती शिवाजी महाराज चौक असे झालेले असले तरी या चौक महाराजांच्या नावावे ओळखला जावा अशी काहीच ओळख नव्हती. ही बाब सातत्याने शिव प्रेमींना सतावत होती. या चौकाबाबत संभ्रम निर्माण होत होता. या चौकात मेघडंबरी उभारून त्यात महाराजांची मूर्ती उभारण्याऐवजी दगडांचे शिल्प उभारले गेले होते. त्यामुळे शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत होते. या शहरात नव्याने येणाऱ्या नागरिकांचा पत्ता विचारताना संभ्रम वाढू लागला होता.

अनेकदा राज्यातून येणारे नागरिक शिवाजी महाराज चौक शोधण्यास सुरुवात करत असत. मात्र सेक्टर1मध्ये येऊनही महाराजांचा पुतळा नसल्याने किंवा तशी कोणतीही खूण नसल्याने अनेक नागरिकांची पत्ता शोधताना धांदल उडत होती. त्यामुळे या चौकातच असलेले डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ हेच या भागाची ओळख बनलेले होते. त्यामुळे चौकाची उरली सुरली ओळख फक्त पत्ता लिहिण्यापूर्ती राहिली होती. मात्र आता या चौकात साजेसा असा छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसवली गेली असल्याने या चौकाला, शहराला देखील शोभा आली आहे.

Pune Land Scam प्रकरणी पार्थ पवारांच्या भागीदारांवर गुन्हा दाखल; अधिकारीही अडचणीत

शासनाचे सर्व निकष पूर्ण

साधारण 10 ते 12 फुटांचा सिंहासनारूढ मूर्ती आहे. मूर्ती उभारणार्‍या संस्थेने मूर्तीचे क्ले मॉडेल तयार केले होते. कला संचालनालयाची मान्यता घेत मॉडेलप्रमाणेच मूर्ती उभारण्याची दक्षता घेण्यात आली आहे. एखादी मूर्ती उभारताना त्याच्या दोन की. मीच्या त्रिज्येच्या परिसरात दुसरी मूर्ती उभारलेली नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार नेरूळ सेक्टर १ येथील चौकात नव्याने बसवली जाणारी मूर्ती शासनाच्या सर्व निकषांमध्ये बसली असून सर्व परवानग्या पालिकेला मिळाल्या आहेत.मात्र राजकारण्यांच्या उद्घाटनाच्या श्रेयापायी मात्र शिवराय उद्याच्या फेऱ्यात अडकले आहेत.

नेरूळचा चौक सजला, मात्र प्रतीक्षा कायम

महाराजांची मूर्ती उभारली जाणार असली तरी त्याला शोभेसे असे वातावरण पालिकेने याआधीच चौकात तयार करून ठेवल्याचे दिसून येत आहे. चौकाच्या लगतच्या दुभाजकांवर शिवकालीन तटबंदी तयार करण्यात आली आहे. तसेच मेघडंबरीभोवती मातीचे मावळे उभे करण्यात आले आहेत. त्यांच्या हातात भाले तसेच शिवकालीन शस्त्र दिलेली आहेत. त्यासह शिवकालीन तोफा ठेवण्यात आल्याने हे चित्र कोणालाही भारावून टाकेल असेच दिसत आहे. मात्र त्यात शिवराय विराजमान होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

Web Title: Navi mumbai controversy over shivaji maharajs statue in nerul challenge to the municipality for inauguration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Purandar Airport: ‘जमीन संपादनासाठी प्रति एकर १ कोटी रुपये स्वीकारार्ह नाही,’ शेतकऱ्यांनी केली जास्त नुकसानभरपाईची मागणी
1

Purandar Airport: ‘जमीन संपादनासाठी प्रति एकर १ कोटी रुपये स्वीकारार्ह नाही,’ शेतकऱ्यांनी केली जास्त नुकसानभरपाईची मागणी

Women’s World Cup 2025: महिला क्रिकेट विश्वचषक ठरला ‘पर्यावरणपूरक’! DY पाटील स्टेडियमवर ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन
2

Women’s World Cup 2025: महिला क्रिकेट विश्वचषक ठरला ‘पर्यावरणपूरक’! DY पाटील स्टेडियमवर ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन

मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप
3

मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी
4

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.