Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; सिडकोच्या गृहनिर्माण संस्थांना मनपा देणार नागरी सुविधा

गरजेपोटी बांधलेली घरे प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन नियमित करणार याबाबत अनधिकृतचा शिक्का बसलेल्या अल्प उत्पन्न गटातील घरांचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नेमंक प्रकरण काय, जाणून घ्या..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2025 | 05:29 PM
Navi Mumbai News : प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; सिडकोच्या गृहनिर्माण संस्थांना मनपा देणार नागरी सुविधा

Navi Mumbai News : प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; सिडकोच्या गृहनिर्माण संस्थांना मनपा देणार नागरी सुविधा

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे, स्नेहा जाधव,काकडे : नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असले तरी येथील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी विनंती केल्यानंतर नगरविकास, सिडको आणि नवी मुंबई महापलिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न संपन्न झाली. बैठकीत सर्वसमावेशक चर्चा होऊन सर्व प्रश्नांचे  तातडीने निराकरण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आले.

नवी मुंबई हे एक सुंदर आणि नियोजनबद्ध शहर असले तरी काही भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या कायम आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईकरांना दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असिम गुप्ता, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे संचालक गणेश देशमुख, संचालक दयानिधी राजा तसेच तिनही खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कंडोमिनियम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या 70 टक्के भागामध्ये येथील रहिवासी राहतात. सिडकोने बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. या भागांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा, रस्त्यावरील दिवे अशा अनेक सुविधा वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. कारण या भागात जमिनी सिडकोच्या मालकीच्या असून महापालिकेने नागरी सुविधा देण्याचे कामे 2011 पासून बंद केली आहे. सिडकोने ही घरे दिली, पण महापालिकेने त्यांना आवश्यक सुविधा देणे बंद केले. या वस्त्यांमध्ये कोणतीही नागरी कामे झाली नव्हती. या बैठकीत महापालिकने मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात, मल:निसारण (ड्रेनेज) आणि पाणीपुरवठा यासंबंधीची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी महापालिकेला दिले. रस्त्यावरील पथदिवे, रस्ते आणि इतर सुविधांसाठीही शासन लावकारच मान्यता देण्यात देईल, असे यावेळी सांगण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिडकोने बांधलेल्या एलआयजी, एमआयजी, बीयूडीपी कंडोनियम या अल्प उत्पन्न गटाच्या घरांमध्ये गरजेपोटी काही ठिकाणी अधिक बांधकाम झाले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्या घरांना अनधिकृत ठरवत कोर्टाच्या आदेशानुसार नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेतून हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, कोर्टाने दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीत वाढ मागून नागरिकांना दिलासा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिली.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा अंतिम निर्णय शिवसेनेच्या प्रयत्नांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी घेतला. या संदर्भात सर्वेक्षणा संदर्भात सिडको अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांना विश्वासात घेऊन सर्वे करावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

शिवसेना उपनेते विजय नहाटा, विजय चौगुले, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीतलताई कचरे, सरोज पाटील, दमयंती आचरे, शहर प्रमुख विजय माने, मनोज हळदणकर, माजी नगरसेवक रोहिदास पाटील, सुरेश कुलकर्णी, रमाकांत म्हात्रे, शिवराम पाटील, सुरेश सकपाळ, प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर सुतार, रवींद्र पाटील, विजयानंद माने, सोमनाथ वासकर, रंगनाथ आवटी, दिव्या गायकवाड, वैभव गायकवाड, अंकुश सोनवणे, अविनाश लाड, दिलीप घोडेकर, रमेश शिंदे, जितेंद्र कांबळी, नवनाथ चव्हाण, गजानन काळे, सचिन कदम, विकास भोणे, अभिजीत देसाई, डॉ. नितीन तिघे, संदीप यादव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, साईनाथ वाघमारे, महेश कुलकर्णी, भावेश पाटील, राजू पाटील, जगदीश गवते, साहिल चौगुले, रतन मांडवे, रेवेंद्र पाटील, सुरेश सकपाळ, गगनदीप कोहली इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असिम गुप्ता, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे संचालक गणेश देशमुख, संचालक दयानिधी राजा यांना पुष्पगुच्छ देऊन नवी मुंबईकरांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले. ही बैठक म्हणजे नवी मुंबईच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्रिय पुढाकारामुळे आणि आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. आता लवकरच नवी मुंबईच्या नागरी सुविधांमध्ये बदल दिसून येईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Navi mumbai news big relief for project victims municipal corporation will provide civic facilities to cidcos housing societies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • cidco news
  • Naresh Mhaske
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
1

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद
2

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकाऱ्यांची बदली
3

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकाऱ्यांची बदली

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा
4

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.