
एक सहकारी आपल्यात नाहीये, याची मला...; धनंजय मुंडेंना जेलमधल्या वाल्मिक कराडची आठवण
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
मला माझ्या सहकाऱ्याची आज आठवण येतेय. परळीतले जगमित्र कार्यालय १२ महिने २४ तास सुरू होते आणि आहे. पण तिथे एक व्यक्ती नाहीये. त्या कार्यालयातून अडल्या नडलेल्यांना गोरगरिबांना आपण मदत करायचो. पण या सगळ्यात एक सहकारी आपल्यात नाहीये, याची मला जाणीव आहे. कुणाचे काय चुकले, काय नाही हे न्यायदेवता तपासून पाहील, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याची आठवण काढल्यामुळे विरोधक काय प्रतिक्रीया देणार, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता. धनंजय मुंडे यांची बीडमधील सगळी कामे वाल्मिक कराड हाच पाहायचा. आर्थिक नियोजनापासून अगदी निवडणूक प्रचार यंत्रणेची जबाबदारी देखील वाल्मिक कराड याच्यावरच होती. त्याच वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचे आरोप झाल्यानंतर त्याला जेलमध्ये जावे लागले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही गेले. अनेकदा मंत्रिपद गेल्याची खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. आज तर परळी नगरपालिकेच्या प्रचारावेळी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली