Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे  यांचे समर्थक गोविंद फड यांनी भाजप (BJP) आमदार सुरेश धस आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज तरंगे यांना फेसबुकवरून धमकी दिली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 28, 2026 | 05:19 PM
Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी?
Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे बीड जिल्हा मराठा आरक्षण चळवळीचे केंद्र
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या समर्थकाने प्रक्षोभक वक्तव्य
  • जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती
Beed Crime News: गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, आता एका खळबळजनक घटनेमुळे तणावात भर पडली आहे. धनंजय मुंडे यांच्या एका कट्टर समर्थकाने आमदार सुरेश धस आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना थेट धमकी दिली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या समर्थकाने प्रक्षोभक वक्तव्य करत ही धमकी दिली आहे. यामध्ये आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करतानाच मनोज जरांगे पाटील यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष आता उघडपणे समोर येण्याची चिन्हे आहेत.

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट; धनंजय देशमुखांचा संताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे  यांचे समर्थक गोविंद फड यांनी भाजप (BJP) आमदार सुरेश धस आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज तरंगे यांना फेसबुकवरून धमकी दिली आहे. ” धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि सुरेश धस यांचा खेळ खल्लास,” असं फड यांनी म्हटलं आहे. फड यांच्या या सोशल मीडियावरील धमकीमुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज सकाळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोप वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्टदेखील चांगलीच व्हायरल होत आहे. एकीकडे वाल्मीक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत असताना फड यांनी धमकीची पोस्ट केली आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास, भंडारा लावून बोलतोय.”अशा आशेची पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी फेसबुकवर केल्याने बीडसह राज्यभरात राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. (Beed Crime)

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

गोविंद फड यांची वादग्रस्त पोस्ट

गोविंद फड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये थेट नावे घेत मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेमुळे आणि थेट इशाऱ्यामुळे मराठा आरक्षण समर्थक आणि सुरेश धस यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या एका पोस्टमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Beed crime news if dhananjay mundes hair gets hit the game will be over suresh dhas someone threatened jarange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Beed crime News
  • dhananjay munde
  • Manoj Jarang patil
  • MLA Suresh Dhas

संबंधित बातम्या

‘बळीचा बकरा बनवायचं असेल तर बनवा, पण…’; मनोज जरांगे पाटलांचा महायुती सरकारला थेट इशारा, पुन्हा उपोषणाची घोषणा!
1

‘बळीचा बकरा बनवायचं असेल तर बनवा, पण…’; मनोज जरांगे पाटलांचा महायुती सरकारला थेट इशारा, पुन्हा उपोषणाची घोषणा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.