Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Pati: “बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे…”; कॅबिनेटमधील निर्णयांवरून जयंत पाटलांचा हल्लाबोल

मंत्रीमंडळ बैठकीत उद्योगपती रतन टाटा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीमध्ये जवळपास ८० निर्णय झाल्याची माहिती दिली. महामंडळ, पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्रे विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र्य महामंडळासही कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 11, 2024 | 01:37 PM
Jayant Pati: "बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे..."; कॅबिनेटमधील निर्णयांवरून जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Pati: "बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे..."; कॅबिनेटमधील निर्णयांवरून जयंत पाटलांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेची जोरदार तयारी करत आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून अंतर्गत सर्व्ह देखील केले जात आहेत. दरम्यान पुढील आठवड्यामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज महायुतीच्या मंत्रीमंडळाची शेवटची बैठक असू शकते. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाकडून रेकॉर्डब्रेक असे ८० निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारने काही नवी महामंडळे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. आता यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मंत्रीमंडळ बैठकीत उद्योगपती रतन टाटा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीमध्ये जवळपास ८० निर्णय झाल्याची माहिती दिली. महामंडळ, पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्रे विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र्य महामंडळासही कॅबिनेटमध्ये मान्यता दिली. गोरा कुंभार, कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवला आहे. तसेच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट उत्पादनाची मर्यादा 8 लाखावरुन वाढवून आता १५ लाखांची करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान आता जयंत पाटील यांनी ट्वीट करत काही मिनिटांत घेतलेले हे निर्णय सरकारची आगतिकता दाखवत असल्याचा टोला लगावला आहे.

येत्या विधानसभा निवडणुकांचा धसका सत्ताधारी महायुतीने घेतलेला दिसतो. म्हणूनच ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे महायुती त्रिकुट सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत आहे. पुन्हा सत्तेत येणार नसल्याची महायुतीला खात्री झाल्याने मनाला वाट्टेल त्या घोषणा करुन आश्वासने देत आहे.…

— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 11, 2024

काय म्हणाले जयंत पाटील?

येत्या विधानसभा निवडणुकांचा धसका सत्ताधारी महायुतीने घेतलेला दिसतो. म्हणूनच ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे महायुती त्रिकुट सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत आहे. पुन्हा सत्तेत येणार नसल्याची महायुतीला खात्री झाल्याने मनाला वाट्टेल त्या घोषणा करुन आश्वासने देत आहे. गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांतील विशेषतः कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अवघ्या काही मिनिटांत घेतले गेलेले ८६ निर्णय त्रिकुट सरकारची अगतिकता दर्शवत आहे.

राज्य मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त

  • वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार
  • कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव
  • सावनेर, गोंदिया, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदाच्या कामांना मान्यता
  • वाचन संस्कृती, ग्रंथ चळवळ विकसित करणार
  • नवीन महाविद्यालयांसाठी अर्जाची मुदत वाढवली
  • राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार
  • सिडको व पीएमआरडीएस दिलेले भूखंड गृहनिर्माण संस्थाच्या मालकीचे
  • केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवणार
  • बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी
  • आपले सरकार केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांप्रमाणे मानधन
  • कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला
  • राज्यातील मोठया शासकीय रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची व्यवस्था
  • नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार
  • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे
  • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे
  • बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी ७०९ कोटींचा अतिरिक्त निधी
  • पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला
  • पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना
  • भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित
  • राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी
  • न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग
  • तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय
  • शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी
  • मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ
  • मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ
  • आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता संबंधित विभागांमार्फत
  • राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी
  • शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे
  • प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकासासाठी नागनाथ आण्णा नायकवडी महामंडळ
  • नॉन क्रीमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची केंद्राला विनंती
  • कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता
  • कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांची भरती करणार
  • शाळांना २० टक्के वाढीव अनुदान

 

Web Title: Ncp sharad pawar faction jayant patil criticizes on mahayuti government about cabinet meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 01:37 PM

Topics:  

  • jayant patil
  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.