Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

70 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मिळणार 10 लाखांपर्यंत उपचार; ‘आयुष्मान वय वंदना’ योजना ठरतीये फायद्याची…

सर्वसाधारण आयुष्मान योजनेत कुटुंबाला वार्षिक ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांची मर्यादा आहे. शहर व जिल्ह्यातील अंदाजे १ लाख २० हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 09:16 AM
70 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मिळणार 10 लाखांपर्यंत उपचार; 'आयुष्मान वय वंदना' योजना ठरतीये फायद्याची...

70 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मिळणार 10 लाखांपर्यंत उपचार; 'आयुष्मान वय वंदना' योजना ठरतीये फायद्याची...

Follow Us
Follow Us:

नागपूर : जिल्ह्यातील ७० वर्षांवरील ज्येष्ठांना आता १० लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या विशेष तरतुदीनुसार ‘आयुष्मान वय वंदना’ कार्डधारक ज्येष्ठांना ही वाढीव आरोग्यसुरक्षा मिळणार आहे. ही सुविधा आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय) अंतर्गत लागू केली आहे.

सर्वसाधारण आयुष्मान योजनेत कुटुंबाला वार्षिक ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांची मर्यादा आहे. शहर व जिल्ह्यातील अंदाजे १ लाख २० हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्यातील सर्व शासकीय व आयुष्मान योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयांमध्ये ही कॅशलेस आणि पेपरलेस उपचार सुविधा उपलब्ध राहणार आहे.

‘आयुष्मान वय वंदना’ योजनेअंतर्गत कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, अतिदक्षता विभागातील उपचार तसेच विविध शस्त्रक्रियासारख्या महागड्या वैद्यकीय सेवांचा समावेश केला आहे. त्यामुळे ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे.

घरी बसून कार्ड तयार करण्याची सुविधा

‘आयुष्मान वय वंदना’ कार्ड तयार करण्यासाठी ‘आयुष्मान’ मोबाईल अॅपचा वापर करता येतो. करून ‘७०+’ पर्याय निवडावा लागतो आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आधार पडताळणीनंतर वैयक्तिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करता येते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्ड डाऊनलोड करता येते. याशिवाय, नागरिकांना सीएससी सेंटर, सूचिबद्ध रुग्णालयातील आयुष्मान काऊंटर किंवा संबंधित योजना कार्यालयात जाऊनही नोंदणी करता येणार आहे. मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपीद्वारे लॉग-इन केल्यानंतर आयुष्मान वय वंदन कार्ड मिळू शकणार आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला चांगला प्रतिसाद

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पुणे एसटी विभागातून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात ७३ लाख ७२ हजार ३६७ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतलेला आहे. ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्या अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यांचा लाभ मिळतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) या योजनेसाठी ५८५ रुपये भरून एक स्मार्ट कार्ड घ्यावे लागते, ज्यामुळे वर्षभर प्रवास मोफत करता येतो.

हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार

Web Title: Senior citizens above 70 years of age will get treatment up to rs 10 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • medical treatment

संबंधित बातम्या

‘तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी, पुढील आठवड्यात…’; जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय म्हटलं?
1

‘तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी, पुढील आठवड्यात…’; जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय म्हटलं?

‘…यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे’; ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’वर Devendra Fadnavis यांचे भाष्य
2

‘…यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे’; ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’वर Devendra Fadnavis यांचे भाष्य

हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…
3

हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…

Triple talaq: ‘राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची…’; गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे मोठे विधान
4

Triple talaq: ‘राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची…’; गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.