Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

पाचगणी पोलीस ठाण्यात पोक्सोप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यावरून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 08:33 AM
मोठी बातमी ! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी ! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Follow Us:

मुंबई : पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या ६ महिन्यांत हे ऑडिट पूर्ण केले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आणलेल्या आरोपींनी पळ काढल्याच्या घटना वाढल्याने हा निर्णय सरकारने घेतला आहे.

पाचगणी पोलीस ठाण्यात पोक्सोप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यावरून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. अशा घटना टाळण्यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ससून रुग्णालय पोलीस चौकी उभारण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. यासंदर्भात आमदार हारून खान यांनी यासंबंधी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासंबंधी नवी नियमावली करण्यात आली आहे. तसेच, सेफ्टी ऑडिटचा अहवाल आल्यानंतर रुग्णालयांच्या रचनेत आवश्यक ते तांत्रिक बदल केले जातील, असेही कदम यांनी नमूद केले. सेफ्टी ऑडिट केवळ औपचारिकता न राहता त्यातून ठोस सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या जातील. आरोपींच्या पलायनाच्या घटना रोखणे हे उद्दिष्ट आहे, असे कदम यांनी सांगितले.

नव्या कारागृहांत वैद्यकीय सुविधा

आरोपींना न्यायालयात नेताना होणारा अफाट खर्च आणि गैरप्रकारांचा मुद्दा भाजप आमदार हरिश पिपंळे यांनी मांडला. त्यावर, ‘व्हीसी’द्वारे सुनावणी घेण्याचे प्रमाण वाढवले जात आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहांतच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा दिल्या जातील. यामुळे आरोपींना बाहेर नेण्याची वेळ येणार नाही, असे कदम यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : Matheran News : देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

पोलिस असल्याचे भासवत तरुणाचे अपहरण

दुसऱ्या एका घटनेत, पोलिस असल्याचे भासवून तरुणाचे अपहरण करून मारहाण करत पैशांची मागणी करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, लोहगाव पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे संभाव्य गंभीर प्रकार टळला, असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी किरण उनवणे (रा. बोल्‍हेगाव, जि. अहिल्यानगर) याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदिप शंकर डोंगरे (वय ३४, रा. मोझेनगर, लोहगाव) यांनी लोहगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

Web Title: Safety audit of all government hospitals in maharashtra will be conducted soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • political news
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!
1

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
3

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम
4

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.