Amol Kolhe: "महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची..."; मुंडेंच्या राजीनाम्यावर अमोल कोल्हेंचे विधान
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
अजित पवार यांना बीडच पालकमंत्री पद देण्यात आल आहे. बीड शांत होण्याची अपेक्षा अजित पवारांकडून व्यक्त करता का? याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की प्रत्येक भागाची अपेक्षा आहे कारण पालकमंत्री पद कशासाठी अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक गोष्टीवर जर घटक पक्ष नाराज होत असेल तर हे सरकार नाराज सरकार आहे का? अस प्रश्न उपस्थित होत आहे, असे यावेळी कोल्हे म्हणाले.
हेही वाचा: सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर आता पुन्हा बीडमध्येच खंडणीप्रकरण उघड; माजी सरपंचानेच महिला सरपंचाला…
राष्ट्रवादी पक्षात फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की जयंत पाटील यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लोकसभेला यश मिळालं आहे. यांच्या नेतृत्वाखाली कार्यकरणीचा आढावा घेतला जाईल.प्रदेशअध्यक्ष पद याबद्दल सर्वस्व निर्णय पवार साहेबांचा असेल.ते जे काही निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असणार असल्याचं यावेळी कोल्हे म्हणाले.