Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

पुण्यातील ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट येथे देश-विदेशातून लोक मनःशांतीच्या शोधात येतात. विविध ध्यानपद्धती, शांत वातावरण आणि परवडणारी राहण्याची सोय यामुळे हे ठिकाण आत्मशोधासाठी खास मानले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 17, 2026 | 08:24 AM
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Follow Us
Follow Us:
  • जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक ओशो ध्यानकेंद्राला भेट देतात.
  • पुण्यात वसलेले हे धार्मिक केंद्र आत्मिक शांतीसाठी फार लोकप्रिय आहे.
  • चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पुण्यातील ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट हे देश-विदेशातून येणाऱ्या हजारो साधकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. आधुनिक जीवनातील ताण, धावपळ आणि मानसिक अस्थिरतेपासून दूर जाऊन स्वतःकडे वळण्याची संधी येथे मिळते. हिरवाईने नटलेले शांत वातावरण, सुबक वास्तुरचना आणि शिस्तबद्ध दिनक्रम यामुळे येथे आल्यावर मन आपोआप स्थिर होऊ लागते. जगभरातील लोक येथे केवळ पर्यटनासाठी नाही, तर आत्मशोध आणि अंतर्मनातील शांततेच्या शोधासाठी येतात.

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

अलीकडेच पुनीत जिंदल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेज zorbathezenn वर येथे अनुभवलेले काही खास क्षण शेअर केले. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, जर तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा असेल, स्वतःचे महत्त्व ओळखायचे असेल आणि मनाशी प्रामाणिक संवाद साधायचा असेल, तर हे ठिकाण योग्य आहे. येथे विविध प्रकारच्या ध्यानपद्धती शिकवल्या जातात, ज्या शरीर, मन आणि भावना यांचा समतोल साधण्यास मदत करतात.

डायनामिक मेडिटेशन

डायनामिक मेडिटेशन ही सकाळी केली जाणारी एक सक्रिय ध्यानपद्धती आहे. सुमारे एका तासाच्या या प्रक्रियेत खोल श्वासोच्छ्वास, भावनांचा मुक्त उद्रेक, शांतता आणि शेवटी उत्सवाचा टप्पा असतो. ही पद्धत मनातील दडपलेल्या भावनांना बाहेर पडू देते आणि हलकेपणा देते.

कुंडलिनी मेडिटेशन

कुंडलिनी मेडिटेशनमध्ये शरीराला मोकळेपणाने थरथरू देणे, नृत्य करणे आणि नंतर शांत बसणे असे टप्पे असतात. या प्रक्रियेमुळे शरीरातील सुप्त ऊर्जा जागृत होते आणि मन प्रसन्न होते.

विपश्यना

विपश्यना ही प्राचीन ध्यानतंत्र आहे. यात श्वासाच्या येण्या-जाण्याकडे सजगतेने लक्ष दिले जाते. या साधनेमुळे जागरूकता वाढते आणि विचारांकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता विकसित होते.

नादब्रह्म

नादब्रह्म ध्यानामध्ये गूंज निर्माण करणारे गुणगुणणे आणि हातांच्या हालचाली यांचा समावेश असतो. या प्रक्रियेमुळे शरीरात सूक्ष्म कंपन निर्माण होतात आणि अंतर्मनात शांतता अनुभवास येते.

मंडला

मंडला ध्यानात जागेवर धावणे आणि त्यानंतर शांत बसणे असे टप्पे असतात. या क्रियेमुळे शरीरातील ऊर्जा एकसंध होते आणि मन स्थिरावते.

नटराज

नटराज ध्यानात नृत्यालाच ध्यानाचे रूप दिले जाते. संपूर्ण शरीराला मुक्तपणे नृत्य करू दिल्याने मनातील ताण कमी होतो आणि व्यक्ती स्वतःशी अधिक जोडली जाते.

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

झाझेन

झाझेन ही झेन परंपरेतील ध्यानपद्धती आहे. यात शांतपणे बसून विचारांचे निरीक्षण केले जाते आणि कधी हळूहळू चालत ध्यान केले जाते. या प्रक्रियेमुळे अंतर्मनातील स्थैर्य वाढते.
येथे राहण्याची सोयही उपलब्ध आहे. साधकांसाठी स्वच्छ आणि साधे निवासस्थान दिले जाते. दिवसातून तीन वेळा भोजन आणि दोन वेळा चहा मिळतो. खर्च तुलनेने परवडणारा असल्यामुळे अनेक जण काही दिवसांचा मुक्काम करून संपूर्ण अनुभव घेतात.

मनःशांती, आत्मपरीक्षण आणि नवीन उर्जेसाठी जर तुम्हाला एखादे शांत आणि सकारात्मक ठिकाण हवे असेल, तर पुण्यातील हे ध्यानकेंद्र नक्कीच विचार करण्यासारखे आहे.

Web Title: Why do people from all over the world come to the osho meditation center in pune travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • Pune
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
1

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही
2

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
3

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
4

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.