Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण होणार लागू; आता ‘या’ चार टप्प्यांत विभागले जाणार शिक्षण

एनईपीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली होती. त्यानंतरचा टप्पा असलेल्या शालेय शिक्षणासाठीची तयारीही राज्य सरकारने सुरू केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2025 | 07:02 AM
येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण; आता 'या' चार टप्प्यांत होणार शिक्षण

येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण; आता 'या' चार टप्प्यांत होणार शिक्षण

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्या-टप्प्याने लागू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल. पारंपरिक १०+२+३ ऐवजी नवीन ५+३+३+४ आकृतीबंध स्वीकारण्यात आला असून, शिक्षण आता पायाभूत, पूर्वतयारी, पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक अशा चार टप्प्यांत विभागले गेले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर जारी केला आहे.

एनईपीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली होती. त्यानंतरचा टप्पा असलेल्या शालेय शिक्षणासाठीची तयारीही राज्य सरकारने सुरू केली होती. एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे.

दरम्यान, एससीईआरटीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधाराने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ लागू होईल. त्यामुळे पहिलीसाठी नवीन पाठ्यपुस्तके येतील. २०२६-२७ म्हणजेच पुढल्या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होईल.

आता प्राथमिक, माध्यमिक नाही

आता प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नसून त्याऐवजी पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा चार स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी होईल. तीन ते आठ वर्षांपर्यंत म्हणजेच इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत स्तर असेल. त्या नंतर तिसरी ते पाचवी या इयत्तांचा समावेश पूर्वतयारी स्तरात असेल. सहावी, सातवी आणि आठवी या इयत्तांना पूर्व माध्यमिक स्तरात गणण्यात येईल. तर नववी, दहावी, अकरावी आणि बारावीपर्यंत माध्यमिक स्तर गणला जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात बदलेल अभ्यासक्रम

२०२७-२८ मध्ये इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या चार वर्षांचा अभ्यासक्रम तिसऱ्या टप्प्यात बदलेल. अंतिम टप्प्यात म्हणजेच २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावी या इयत्तांची पुस्तके बदलतील.

Web Title: New education policy to be implemented from next academic year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 06:59 AM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra Education

संबंधित बातम्या

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
1

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच अटक; अधिकारी संघाचे आंदोलन अखेर स्थगित
2

शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच अटक; अधिकारी संघाचे आंदोलन अखेर स्थगित

पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी ‘नापास’; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका
3

पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी ‘नापास’; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी
4

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.