Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच तर 33572 शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उत्तीर्ण

राज्यातील सरकारी वेतनावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला 12 वर्षे पूर्ण झाली की, त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. तसेच 24 वर्षांनंतर हे शिक्षक निवडश्रेणीसाठी पात्र होतात. त्यासाठी या शिक्षकांना प्रशिक्षण घ्यावे लागते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2025 | 08:09 AM
अनुदानित शाळा धोक्यात? नोव्हेंबरचे वेतन रखडण्याची शक्यता, 'हे' कारण ठरतंय अडचणीचे

अनुदानित शाळा धोक्यात? नोव्हेंबरचे वेतन रखडण्याची शक्यता, 'हे' कारण ठरतंय अडचणीचे

Follow Us
Follow Us:

मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा सुरू असतानाच शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेले वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण हजारो शिक्षकांनी पूर्ण करूनही त्यांना प्रमाणपत्रच मिळाले नव्हते. शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवता येत नव्हता. त्यामुळे मोठे नुकसान होत होते. मात्र, आता एससीईआरटीने पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने शिक्षकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्यातील सरकारी वेतनावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला 12 वर्षे पूर्ण झाली की, त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. तसेच 24 वर्षांनंतर हे शिक्षक निवडश्रेणीसाठी पात्र होतात. त्यासाठी या शिक्षकांना प्रशिक्षण घ्यावे लागते. या प्रशिक्षणादरम्यान आणि नंतरही त्यांच्या चाचण्या होतात. या चाचण्या उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते आणि वेतनश्रेणीत बदल होतो. यंदा राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयांमधील 40 हजार 81 शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 39 हजार 841 शिक्षक प्रशिक्षणासाठी पात्र ठरले होते.

या पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण विविध टप्प्यांमध्ये आणि विविध तुकड्यांमध्ये झाले. या प्रशिक्षणादरम्यान ५ हजार ५२७ शिक्षक अनुत्तीर्ण होते, तर ३४ हजार ३१४ शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यापैकी ३३ हजार ५७२ शिक्षक प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले. तर अद्याप ५६३ शिक्षकांची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

दहावी-बारावीची परीक्षा सुरू असतानाच शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेले वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण हजारो शिक्षकांनी पूर्ण करूनही त्यांना प्रमाणपत्रच मिळाले नव्हते. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी घाई करणाऱ्या शिक्षण विभागाने प्रमाणपत्रे देण्यात मात्र दिरंगाई केल्याने नाराज झालेल्या तब्बल ३४ हजार शिक्षकांना आता पुढील आठवड्याभरात ही प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

पुढील आठवड्यात मिळणार प्रमाणपत्रे

या शिक्षकांना उत्तीर्ण होऊनही अद्यापही प्रमाणपत्र न मिळाल्याने शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवू शकले नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे मोठे नुकसान झाले. मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभागाचे अध्यक्षांनी हे प्रकरण एससीईआरटीच्या संचालकांच्या निदर्शनास आणून देत शिक्षकांना तातडीने प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी विनंती केली.

Web Title: The process of 563 teachers in the state is still incomplete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 08:09 AM

Topics:  

  • Education Sector
  • Maharashtra Education
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
1

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश
2

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
3

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.