Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

latur News: नवीन प्रभाग रचनेच्या आदेशाला न्यायालयात आव्हान; अफसर शेख यांची न्यायालयात याचिका

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग दिला आहे. मात्र, नव्या प्रभाग रचनेमुळे काही ठिकाणी असंतोष व्यक्त होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 13, 2025 | 04:08 PM
latur News: नवीन प्रभाग रचनेच्या आदेशाला न्यायालयात आव्हान; अफसर शेख यांची न्यायालयात याचिका
Follow Us
Follow Us:

Latur News:  राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वारे वाहू लागले असतानाच लातूर जिल्ह्यातील औसा येथील माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग रचनेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी 10 जून 2025 रोजी राज्य सरकारने घोषित केलेल्या प्रभाग रचना आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.

सदर याचिकेमध्ये 8 जुलै 2022 रोजी स्थगित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम जशाच्या तसा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या निवडणूक प्रक्रियेत केवळ मतदार यादीचे नूतनीकरण व ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीपुरतेच बदल मर्यादित ठेवावेत, अशी स्पष्ट विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत ATS ची एन्ट्री; डीव्हीआर जप्त अन्…

या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू. सांबरे आणि न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्टाने राज्य निवडणूक आयोगासह राज्य सरकारला नोटीस बजावली असून, याचिकेवर पुढील सुनावणी 19 जून रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग दिला आहे. मात्र, नव्या प्रभाग रचनेमुळे काही ठिकाणी असंतोष व्यक्त होत असून, औसा येथील ही याचिका त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरत आहे.

औसा येथील माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी राज्य सरकारच्या 10 जून 2025 रोजी जाहीर झालेल्या नवीन प्रभाग रचना आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे की, ही नवी प्रभाग रचना सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशांचे उल्लंघन करणारी आहे.

याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, 14 मे 2025 रोजी राज्य निवडणूक आयोगाने शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवून नव्याने प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले. या आदेशामध्ये पूर्वीच निवडणूक जाहीर झालेल्या 92 नगरपरिषद व 4 नगरपंचायतीचाही समावेश आहे. त्यानंतर, 10 जून 2025 रोजी राज्य सरकारने नवीन प्रभाग रचना आणि इतर निवडणूकसंबंधी बाबी अधिकृतपणे जाहीर केल्या.

भिगवणकरांना मिळणार नवीन सुसज्ज बस स्थानक; परिवहनमंत्र्यांनी केली बस स्थानकाची पाहणी

मात्र याचिकाकर्त्यांच्या मते, 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 11 मार्च 2022 रोजीचे नवीन प्रभाग रचनेचे आदेश वैध नाहीत. तसेच, 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांमध्येही नवीन प्रभाग रचनेविषयी कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे या निर्णयांना कायदेशीर मान्यता नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला.

“एकदा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, त्यामध्ये कोणताही फेरफार करता येत नाही,” असे म्हणत अफसर शेख यांनी या निर्णयाला आव्हान दिले. तसेच, निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्य सरकार व निवडणूक आयोगाकडून घेतलेले कोणतेही निर्णय किंवा अधिसूचना प्रभावी ठरत नाहीत, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

यावर सुनावणी करताना न्या. नितीन डब्ल्यू. सांबरे आणि न्या. सचिन एस. देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी 19 जून 2025 रोजी होणार आहे. या याचिकेत अफसर शेख यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मुकुल कुलकर्णी आणि अ‍ॅड. मोबीन शेख यांनी मांडली.

 

 

Web Title: New ward formation order challenged in court officer sheikhs petition in court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Latur Politics
  • Local Body Elections

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.