भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. यावरुन टीका झाल्यानंतर चव्हाण वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत एक वक्तव्य केले. यावरुन जोरदार राजकारण तापले आहे.
काही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, लातूरमध्ये भाजपाने प्रामुख्याने जुने, प्रामाणिक कार्यकर्तेच उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहेत.
लातूर महानगरपालिकेसाठी भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असलेल्या राट्रवादीवर (अजित पवार) युती फिसकटल्याने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली असून, ६० जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंडितराव धुमाळ यांनी राष्ट्रवादी व इतर पक्षातल्या अनेक कार्यकत्यांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग दिला आहे. मात्र, नव्या प्रभाग रचनेमुळे काही ठिकाणी असंतोष व्यक्त होत आहे.