Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane: सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा – नितेश राणे

सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 24, 2025 | 06:37 PM
सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा (फोटो सौजन्य-X)

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज (24 फेब्रुवारी) सागर किनाऱ्यांवर होणारी घुसखोरी रोखणे आणि सागरी सुरक्षा बळकट करणे, तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर या विषयी मंत्री राणे यांनी देशभरातील एआय तंत्रज्ञानाविषयी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला.

चर्चेच्या सुरवातील मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाची एआय तंत्रज्ञानाबाबतची गरज व्यक्त करुन मंत्री राणे म्हणाले की, मत्स्योत्पादनात वाढ आणि सागरी सुरक्षा ही विभागाची प्राथमिकता आहे. सागरी मासेमारी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी असे दोन वेगवेगळे भाग आहेत. या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशा प्रकारे नियोजन करता येईल. राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे. या सागर किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सध्या ड्रोनचा वापर केला जात आहे.

शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार! जमिनीचा वारस नोंद करताना मृताची केली नोंद

त्यातून जमा झालेल्या माहितीचा वापर करून सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याविषयी विद्यार्थ्यांनी विचार करावा. तसेच विभाग स्वयंपूर्ण करणे, विभागाचा महसूल वाढवणे, मत्स्य व्यवसायातील, बंदरांच्या विकासातील अडचणी सोडवणे, अंमबजावणीमध्ये असलेल्या काही त्रुटींची पुर्तता करणे, विभागाचा संपूर्ण कारभार पारदर्शक करणे यासह अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून विभागाचे कामकाज आणखी प्रभावीपणे करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे याविषयीही सविस्तर सादरीकरण विद्यार्थ्यांनी तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पारंपरीक मच्छिमार आणि पर्ससिन मच्छिमार असा एक फरक असला तरी राज्यातील किनारपट्टीच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मासेमारीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे एकाच पद्धतीची योजना किंवा व्यवस्था सर्वच जिल्ह्यांमध्ये लागू करणे व्यवहार्य ठरणार नाही. तर प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे एआय तंत्रज्ञानाची प्रणाली विकसीत करण्यात यावी असेही मंत्री राणे म्हणाले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सुरक्षा आणि उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करावयाच्या उपायांविषयी नवनवीन संकल्पना सुचविल्या. त्यामध्ये मच्छिमारांसाठी मुख पडताळणी (फेस रेक्गनिशन) प्रणाली तयार करणे, किनारा मॅपिंग करणे, जीपीएस फेन्सिंग लावणे, तलावांचे मॅपिंग करणे, राज्यातील एखाद्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर एआय तंत्रज्ञान अधारित विकास प्रकल्प राबवण्यात यावा आणि त्यातून होणारे फायद्यांचे एक रोल मॉडेल तयार करून संपूर्ण राज्यात त्याप्रमाणे योजना राबवावी, सागरी सुरक्षेविषयी एक स्वंतंत्र एआयचे मॉडेल तयार करावे, मॅपिंगच्या माध्यमातून मासेमारी क्षेत्राची माहिती देणारे मॉडेल तयार करणे, मासेमारीसह हवामान आणि योग्य परिस्थितीचा अंदाज वर्तवणारे एआय अधारित मॉडेल तयार करणे अशा संकल्पना विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या संकल्पनांच्या दृष्टीने जीवायएएन (GYAN) यांनी एक परिपूर्ण सादरीकरण तयार करावे. या संकल्पनांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा बळकटीकरण आणि मत्स्योत्पादन वाढ यासाठी कसा वापर करता येईल याचा प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करावा. आपण तयार करत असलेले हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरणारे असेल. तसेच राज्याला मासेमारी क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठीही याचा उपयोग होणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले. यावेळी जीवायएएन (GYAN) चे योगेश राव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तर डॉ. उमेश राऊत, नकुल प्यासी यांच्यासह देशभरातील विविध शहरातील विद्यार्थी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Pratap Sarnaik : येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून “स्कूल बसेस” साठी नियमावली लागू करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Web Title: Nitesh rane on use of ai technology is important for enhancing fisheries along with marine security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Fishery
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
1

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
2

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
3

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती
4

ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.