कर्जत – बुधवारची सकाळ सिनेसृष्टीसाठी धक्कादायक ठरली आहे. कारण प्रसिद्ध कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. (Nitin Desai Sucide) कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांनी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला (Hindi Cinema) एका वेगळ्या वळणावर व उंचीवर घेऊन गेले होते. तसेच त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपट केले होते. पण त्यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण आता समोर येवू लागले आहे. आता त्यांनी कर्जाचा बोजा, आर्थिक संकटामुळं तसेच स्टुडिओ चालत नसल्यामुळं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोरे आलेय. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हॉइस रेकॉर्ड केला होता, ती क्लिप सध्या पोलिसांकडून असून, यातून पोलीस चौकशी करताहेत. (Nitin Desai made a voice record clip before suicide, four of which industrialist? Investigation by the police will begin, soon)
एडेलवाईज समूहातील ईसीएल फायनान्सकडून १८१ कोटींचे कर्ज
दरम्यान, कला दिग्दर्शक नितीन देसाई हे कर्जाचा बोजाखाली होते. कामगारांच पगार बाकी होता. या तणावातून त्यांनी हे टोकाले पाऊल उचलले असल्याचं बोललं जातंय. त्यांची कंपनी एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडविरोधात दिवाळखोरी संहितेंतर्गत दाखल केलेल्या दाव्यावर कार्यवाहीचा अंतिम आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने आठ दिवसांपूर्वी २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत दिला होता. एडेलवाइज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने एकूण २५२ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या प्रकरणी गेल्या वर्षी दाखल केलेल्या दाव्यानुसार न्यायाधिकरणाने हा आदेश दिला. यातून कंपनीच्या स्टुडिओसह अन्य मालमत्तांवरील देसाई यांची मालकी जाऊन, सर्व कारभार हा एनसीएलटीद्वारे नियुक्त प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्या हाती दिला गेला होता. देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडने एडेलवाईज समूहातील ईसीएल फायनान्सकडून २०१६ आणि २०१८ असे दोन टप्प्यांत एकूण १८१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ३१ मार्च २०२२ आणि ९ मे २०२२ अशा अनुक्रमे या दोन मुदत कर्जाच्या परतफेडीच्या अंतिम तारखा होत्या. त्या पाळल्या न गेल्याने कर्ज बुडीत खात्यात अर्थात ‘एनपीए’ म्हणून वर्ग करण्यात आले होते. या कर्जाची परतफेड कशी करायची म्हणून नितीन देसाई तणावाखाली होते. अशी माहिती समोर येतेय.
कोणते चार उद्योगपतीं?
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हॉइस रेकॉर्ड केला होता, ती क्लिप सध्या पोलिसांकडून असून, यातून पोलीस चौकशी करताहेत. या क्लीपमध्ये 4 उद्योगपतींची नावे असल्याचा दावा केला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या उद्योगपतींनी आपल्याला कसे छळले, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता हे चारही व्यावसायिक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची भीती आहे. पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचीही माहिती आहे. नितीन देसाई यांनी मंगळवारी रात्री दिल्लीहून मुंबईला आले. त्यानंतर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ते कर्जतच्या एनडी स्टुडिओत पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावले. तुला उद्या सकाळी मी व्हॉइस रेकॉर्डर देतो, असे ते त्यांना म्हणाले.