Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र

कळंबयेथून नेरळ कडे येत असलेल्या एसटी गाडीला पोशीर जवळ बिघाड झाला आणि नंतर विद्यार्थ्यांना पायपीट करून परीक्षा केंद्र गाठावे लागले. पोशिर गावच्या अलीकडे दीड किलोमीटर अंतरावर ही एसटी गाडी बंद पडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2026 | 01:04 PM
नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र

नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र

Follow Us
Follow Us:

कर्जत : सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून आज दहावीचा संस्कृत पेपर आहे. हा पेपर देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेला एसटी गाडी मध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. कळंबयेथून नेरळ कडे येत असलेल्या एसटी गाडीला पोशीर जवळ हा बिघाड झाला आणि नंतर विद्यार्थ्यांना पायपीट करून परीक्षा केंद्र गाठावे लागले.

सकाळची वेळ शक्यतो आपल्या निश्चित ठिकाणी नोकरीचे ठिकाणी जाण्याची प्रत्येकाची धावपळ असते. त्यात सध्या दहावीच्या परीक्षेचा पेपर देखील आहे.त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते.कर्जत तालुक्यातील कळंब भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे पोशिर येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी धावपळ सुरू असते.

Pune Metro: प्रदूषणाशी लढा! मेट्रो प्रवासातून दर किलोमीटरला वाचतोय १०८.५ मिलीग्रॅम $CO_2$

आज २५ फेब्रुवारी रोजी दहावीचा पेपर असल्याने आणि सकाळी आपल्या परीक्षा केंद्रावर दहा वाजता आपल्या उपस्थितीची नोंद करण्याची वेळ असल्याने कळंब भागातील दहा गावातील विद्यार्थी पोशिर येथील परीक्षा केंद्राकडे निघाले होते. पोशिर येथील श्रमजीवी विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र असून त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कळंब येथून नेरळ कडे जाणारी एसटी गाडी पकडली. कळंब वरून वेळेवर निघालेली एसटी गाडी पोशिर गावच्या अलीकडे दीड किलोमीटर अंतरावर ही एसटी गाडी बंद पडली. त्यानंतर एसटीचे चालक आणि वाहक यांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी तास झाला तरी सुरू होत नव्हती, शेवटी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले.

या गाडी मधून नेरळ कडे जाणारे शहजाद लोगडे या तरुणाने रस्त्यावर उतरून पोशिर नेरळ कडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून एसटी मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठवून देऊ लागले.परीक्षेची वेळ जवळ येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी तेथून पायी वारी देखील सुरू केली.मात्र दीड दोन किलोमीटर अंतराचा प्रवास आणि त्यानंतर परीक्षा द्यायची असल्याने रस्त्याने जाणारे वाहनचालक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता.अनेक दुचाकी चालक तसेच कार चालक हे विद्यार्थ्यांना घेऊन पोशिर विद्यालयाच्या जवळ सोडतानाचे आशादायक चित्र एसटी गाडी बंद पडल्यानंतर दिसून येत होते.

अचानक बंद पडलेल्या एसटी गाडी मध्ये २५ चे आसपास विद्यार्थी होते आणि ते सर्व परीक्षा देण्यासाठी निघाले होते. ओलमन पासून बोरगाव आणि वारे भागातील हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी निघाले होते.साधारण दहा हून अधिक गावातील विद्यार्थी एसटी गाडी बंद पडल्याने तेथे थांबून होते.

St Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा

Web Title: With the st bus to nerul stopped students faced difficulties and had to trek on foot to reach the exam center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Karjat
  • st bus
  • Student

संबंधित बातम्या

IIT Hyderabad Placement: आयआय़टीमध्ये मिळते तब्बल इतक्या लाखांचे पॅकेज; जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया आणि कटऑफचे संपूर्ण गणित
1

IIT Hyderabad Placement: आयआय़टीमध्ये मिळते तब्बल इतक्या लाखांचे पॅकेज; जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया आणि कटऑफचे संपूर्ण गणित

Study in Germany: १२ वी नंतर परदेशात शिक्षणाचे स्वप्न होईल पूर्ण! जर्मनीतील ‘या’ ५ टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये मिळते मोफत शिक्षण
2

Study in Germany: १२ वी नंतर परदेशात शिक्षणाचे स्वप्न होईल पूर्ण! जर्मनीतील ‘या’ ५ टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये मिळते मोफत शिक्षण

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?
3

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?

AI University in India: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; देशातील पहिली सरकारी ‘एआय युनिव्हर्सिटी’ ‘या’ राज्यात उभारणार!
4

AI University in India: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; देशातील पहिली सरकारी ‘एआय युनिव्हर्सिटी’ ‘या’ राज्यात उभारणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.