Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran Rickshaw Strike: माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ई रिक्षा बंदच, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

२३ फेब्रुवारी पासून ई रिक्षा बेमुदत बंद करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम शालेय विद्यार्थी, दिव्यांग, रुग्ण, येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे. यासाठी श्रमिक रिक्षा संघटना यांचे पदाधिकारी मंत्रालयात पोहचले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2026 | 12:46 PM
माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ई रिक्षा बंदच, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट (फोटो सौजन्य-Gemini)

माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ई रिक्षा बंदच, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • माथेरानमध्ये पर्यावरण पुरक ई रिक्षा यांचा संप सुरू
  • एकही ई रिक्षा रस्त्यावर आली नाही
  • प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल
माथेरान : माथेरानमध्ये पर्यावरण पुरक ई रिक्षा यांचा संप सुरू असून आज संपाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी देखील एकही ई रिक्षा रस्त्यावर आली नाही आणि त्यामुळे प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले. याचदरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सर्व 94 हात रिक्षा चालक यांना पर्यावरण पुरक ई रिक्षा मिळावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटना यांचे पदाधिकारी मंत्रालयात पोहचले आहेत.

ऑगस्ट 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने माथेरान मधील अमानवी प्रथा बंद करण्याचा निर्णय देताना माथेरान मधील सर्व हात रिक्षा चालक यांना पर्यावरण पुरक ई रिक्षा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश दिले आहेत. या आदेशाची महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यात अंमलबजावणी करावी असे आदेश असल्याने माथेरान श्रमिक रिक्षा संघटना यांनी गेली महिन्यापासून आपली मागणी लावून धरली आहे. या मागणीनुसार माथेरान मध्ये 10 फेब्रुवारी रोजी ई रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या,त्यावेळी राज्यसरकारचे वतीने प्रांत अधिकारी, महसूल अधीक्षक माथेरान आणि माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी विनंती केल्यानंतर बंद मागे घेण्यात आले होता.

St Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा

शासनाचे वतीन 12 फेब्रुवारी रोजी माथेरान सनियंत्रण समितीने निर्णय घेताना 20 ई रिक्षा यांना परवानगी दिली. मात्र आपल्या सर्व 74 हात रिक्षा चालक यांना इ रिक्षा चालवण्याची परवानगी मिळावी म्हणून 23 फेब्रुवारी पासून सर्व इ रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काल पासून माथेरान मधील रस्त्यावर एकही पर्यावरण पुरक ई रिक्षा आलेली नाही.त्याचवेळी शालेय विद्यार्थ्यांना देखील पायपीट करावी लागत आहे. खरे तर शालेय विद्यार्थ्यांसाठी या पर्यावरण पुरक ई रिक्षा सुरू झाल्या आहेत.असे असताना विद्यार्थ्यांना देखील इ रिक्षा उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. परंतु आपल्या मागणीसाठी माथेरान मधील श्रमिक रिक्षा संघटनेचे सदस्य यांनी हुतात्मा स्मारक येथील इ रिक्षा स्टँड येथे एकत्र जमत निदर्शने केली.

जिल्हाधिकारी यांचे आश्वासन…

पर्यावरण पुरक ई रिक्षा यांचा संप सुरू असून सर्व हातरिक्षा चालक यांना पर्यावरण पुरक इ रिक्षा मिळाव्यात यासाठी 23 फेब्रुवारी पासून बंद सुरू आहे.त्यानंतर आज बेमुदत संपाच्या मुंबई येथे मंत्रालय स्तरावरील बैठक घेण्यासाठी श्रमिक रिक्षा संघटना यांचे सर्व पदाधिकारी मुंबईत पोहचले होते.माथेरान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी,माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,यांच्यासह अनेक नगरसेवक तसेच श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार तसेच सचिव सुनील शिंदे आदी मुंबईत पोहचले.या सर्वांनी मुंबईत विधानभवन येथे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली.यावेळी आमदार थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी संपर्क केला.त्यात जिल्हाधिकारी यांच्याकडून सुप्रीम कोर्टाचे आदेशाने सर्व 74 इ रिक्षा यांना टप्प्याटप्याने इ रिक्षा सुरू करण्याचं परवाना दिला जाईल असे आश्वासन दिले आहे.

KDMC News : डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद, अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत; केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप

Web Title: E rickshaws strike were off for the second consecutive day in matheran and school students have to walk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Karjat
  • Matheran
  • tourism

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
2

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी
3

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
4

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.