पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर 'ईडी'ची कोणतीही कारवाई नाही; धाड पडल्याचे 'ते' वृत्त खोटे
पुणे : पुणे शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केल्याची माहिती समोर आली होती. ईडीने टाकलेल्या धाडीत मोठी कारवाई केल्याचेही म्हटले जात होते. मात्र, आता याबाबतची सत्य माहिती समोर आली असून, बांधकाम व्यावसायिकांविरोधात ईडीने कोणतीही चौकशी किंवा कारवाई केलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकावर काही दिवसांपूर्वी ईडीकडून धाड टाकली गेल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे हा बांधकाम व्यावसायिक कोण अशी चर्चाही सुरू झाली होती. त्यानंतर याच चर्चा सुरु असतानाच या प्रकरणात आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून कोणतीही चौकशी अथवा कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : २,७९६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार…! अनिल अंबानी आणि राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, CBI ने न्यायालयात दाखल केले आरोपपत्र
दरम्यान, शहरातील इतर काही बांधकाम व्यावसायिकांविरोधात प्राप्तिकर विभागाकडून नियमित चौकशी सुरू आहे. काही ठिकाणची चौकशी पूर्ण झाली असून, काही ठिकाणी ती पुढील काही दिवसांत संपेल, अशीही माहिती दिली जात आहे.