Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“वज्रमूठ सभा नसून…., सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर टिका; शिंदे म्हणतात…

मविआच्या वज्रमुठ सभेबद्दल छेडले असता मुख्यमत्र्यांनी, संभाजीनगरमधील सभा पाहून बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या. ही खोटी लोकं आहेत, सत्तेसाठी हपापलेली मंडळी आहेत. ज्या संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करीत होते, त्याच संभाजीनगरमध्ये ही सभा झाली आहे. हे दुर्दैवी असून मविआची ही वज्रझुठ सभा असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 03, 2023 | 09:21 AM
“वज्रमूठ सभा नसून…., सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर टिका; शिंदे म्हणतात…
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे – रविवारी (२ एप्रिल ) रोजी महाविकास आघाडीची (MVA) वज्रमूठ विराट सभा संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला अलोट जनसागर लोटला होता. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार भाषणे केली. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी तुफान भाषण करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पण सभेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोचरी टिका केली आहे. “मविआची छत्रपती संभाजीनगर येथील सभा म्हणजे वज्रमुठ नसुन सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा आहे”. अशी खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडवली आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी मविआ सभेचा जोरदार समाचार घेतला.

९ एप्रिल रोजी अयोध्या दौरा…

दरम्यान, यावेळी येत्या ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार – खासदारांसह अयोध्या दौर्‍यावर जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाण्यातील आनंद आश्रम येथे रविवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेला अभिनेते शरद पोंक्षे,राज्य समन्वयक नरेश म्हस्के,माजी आ. रविंद्र फाटक उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, याआधी अयोध्या दौर्यात काही आमदारांना विमानातून उतरावं लागल्याने रामाचे दर्शन झाले नव्हते. तेव्हा, येत्या ९ एप्रिलला सर्व आमदार-खासदारांसमवेत अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले. अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा, आस्थेचा विषय आहे, अयोध्येत भव्य राम मंदीर उभारले पाहिजे. हे स्वप्न बाळासाहेबांचे होते ते पंतप्रधानांनी पूर्ण केले आहे. तेव्हा, खारीचा वाटा म्हणुन जशी धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी चांदीची वीट पाठवली तशीच आम्ही देखील आता महाराष्ट्रातुन सागाची लाकडे अयोध्येला पाठवल्याचे मुख्यमंत्रानी सांगितले.

…तर बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या

मविआच्या वज्रमुठ सभेबद्दल छेडले असता मुख्यमत्र्यांनी, संभाजीनगरमधील सभा पाहून बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या. ही खोटी लोकं आहेत, सत्तेसाठी हपापलेली मंडळी आहेत. ज्या संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करीत होते, त्याच संभाजीनगरमध्ये ही सभा झाली आहे. हे दुर्दैवी असून मविआची ही वज्रझुठ सभा असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष पुढे नेत असताना काही घटना अशा घडल्या, त्या आम्ही आणि सर्वांनी अनुभवल्या आहेत. शिवधनुष्य पेलण्याकरता तेवढे मोठे मन आणि विचार लागतात, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम त्यावेळी बाळासाहेबांनी केले. पण आता हे सर्व कालबाह्य झाले.आता फक्त स्वतःपुरता विचार करून मी आणि माझा परीवार अशा विचाराने लोकं काम करत आहेत. अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली.

Web Title: Not a vajramooth sabha but a vajrazootha meeting of power hungry liars chief minister eknath shinde remarks on mva meeting shinde says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2023 | 09:21 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
1

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
2

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
3

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का
4

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.