Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Shivsena Merger : शिंदे आणि ठाकरे गटाच्या एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले तर आनंदच होईल, असं विधान केलं आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 08, 2026 | 09:26 PM
Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar

Follow Us
Follow Us:
  • शिंदे-ठाकरे एकत्र येण्यावर ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
  • दोन्ही पक्षांचे प्रमुखच अंतिम निर्णय घेणार – ओमराजे
  • चंद्रकांत रघुवंशींच्या विधानाने मोठ्या चर्चा
 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली असतानाच आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित होत असतानाच शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. (Shivsena Merger)

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत आपली भूमिका मांडली. दोन्ही पक्षांचे प्रमुख सध्या वेगवेगळे असल्याने एकत्रीकरणाचा अंतिम निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मात्र, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच होईल. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांचीही अशीच भावना असल्याचं ओमराजे म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! दौऱ्याआधीच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने शिंदेगटात भूकंप, नेमकं काय घडलं?

‘आमचं काम एवढं वाईट होतं का?’

यावेळी ओमराजे यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावरही भाष्य केलं. पक्षबदलाचा निर्णय कोणीही आनंदाने घेत नसतो. त्यामागे काहीतरी परिस्थिती निर्माण झालेली असते, असं त्यांनी सांगितलं. जनतेने आरसा दाखवायला सुरुवात केली होती. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. एकही नगरपालिका किंवा पंचायत समिती मिळू नये इतकं आमचं काम वाईट होतं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत रघुवंशींच्या विधानानंतर चर्चेला वेग

दरम्यान, शिंदे गटाचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही याआधी शिवसेनेच्या एकत्रीकरणाबाबत विधान केलं होतं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ती खरी दिवाळी ठरेल, असं ते म्हणाले होते. आता ओमराजे निंबाळकर यांनीही दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्याने या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

मात्र, राज्यातील राजकीय घडामोडी पाहता या सर्व विधानांनंतरही दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चांवर उदय सामंतांचं मोठं विधान!

Web Title: Omraje nimbalkar statement shinde thackeray shivsena merger vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mp Omraje Nimbalkar
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! दौऱ्याआधीच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने शिंदेगटात भूकंप, नेमकं काय घडलं?
1

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! दौऱ्याआधीच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने शिंदेगटात भूकंप, नेमकं काय घडलं?

Shiv Sena : दिवाळीचा फराळ शेतकऱ्यांसोबत; एकनाथ शिंदेंपासून मंत्र्यांपर्यंत बांधावर जाणार, उदय सामंत यांची माहिती
2

Shiv Sena : दिवाळीचा फराळ शेतकऱ्यांसोबत; एकनाथ शिंदेंपासून मंत्र्यांपर्यंत बांधावर जाणार, उदय सामंत यांची माहिती

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला
3

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला

एकनाथ शिंदेंकडून तांड्यावरील नागरिकांना दिवाळीची भेट; स्वखर्चातून आनंदाचा शिधा वाटप
4

एकनाथ शिंदेंकडून तांड्यावरील नागरिकांना दिवाळीची भेट; स्वखर्चातून आनंदाचा शिधा वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.