Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : नंदनवन बनलं आनंदवन! दिव्यांग बांधवांसोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी, फराळ केला अन् दिल्या खास भेटवस्तू

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदनवन निवासस्थानी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. फराळ, भेटवस्तू आणि शुभेच्छांच्या माध्यमातून आनंदाचे क्षण अनुभवताना दिव्यांग कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही त्यांनी दिली.

  • By विवेक
Updated On: Nov 08, 2026 | 10:37 PM
Eknath Shinde Diwali

Eknath Shinde Diwali

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
  • नंदनवन निवासस्थानात रंगला दिवाळी स्नेहमेळावा
  • दिव्यांग बांधवांसोबत फराळ, भेटवस्तूंचे वाटप
 

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, आनंदाचा सण आणि आपल्या माणसांसोबत सुखाचे क्षण वाटून घेण्याचा दिवस. मात्र, गरजू आणि दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आनंदाचा दिवा लावला तर त्याहून मोठा सण कोणता? असाच माणुसकीचा संदेश देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या खास स्नेहमेळाव्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं. (Eknath Shinde)

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग बांधवांसोबत फराळ केला, त्यांना भेटवस्तू दिल्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

‘आपल्या माणसांच्या आयुष्यातील अंधार दूर करून आशेचा आणि विश्वासाचा दिवा लावणे म्हणजे खरी दिवाळी’, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड जिद्द आणि चिकाटी असून त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Ahilyanagar News : शेवगावमधील खाकी वर्दीतील संवेदनशील चेहरा; पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी स्मशानभूमीत साजरी केली अनोखी दिवाळी

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय, निधीबाबतही महत्त्वाची माहिती

दिव्यांगांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळावा यासाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 1 टक्का निधी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय, जयपूर फूट, वॉकर, श्रवणयंत्र आणि इतर आवश्यक उपकरणांचं वाटप करण्यात आलं आहे. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही राबवण्याचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांसोबतही दिवाळी साजरी करणार

यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणींचाही एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केला. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसोबत जालन्यात जाऊन दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांनी धीर सोडू नये आणि कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन करत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी नमूद केलं.

एकूणच, दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात दिव्यांग बांधवांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठीच्या उपक्रमांवरही भर देण्यात आला.

Mumbai News : शिवाजी पार्कमध्ये दिवाळी पहाट रंगली! 10 हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती; दुष्काळग्रस्तांसाठी 2.15 कोटींची मदत

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी कुठे साजरी केली?

    Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील त्यांच्या 'नंदनवन' निवासस्थानी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी स्नेहमेळावा आयोजित केला होता.

  • Que: दिव्यांगांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून किती निधी दिला जाणार आहे?

    Ans: जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 1 टक्का निधी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • Que: आनंद आश्रमात किती दिव्यांगांना उपकरणांचे वाटप करण्यात आले?

    Ans: ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात दीड हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात-पाय, जयपूर फूट, वॉकर, श्रवणयंत्र आणि इतर आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Eknath shinde diwali celebration with disabled people nandanvan vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 10:37 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • diwali news
  • Eknath Shinde
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News : शेवगावमधील खाकी वर्दीतील संवेदनशील चेहरा; पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी स्मशानभूमीत साजरी केली अनोखी दिवाळी
1

Ahilyanagar News : शेवगावमधील खाकी वर्दीतील संवेदनशील चेहरा; पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी स्मशानभूमीत साजरी केली अनोखी दिवाळी

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
2

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Mumbai News : शिवाजी पार्कमध्ये दिवाळी पहाट रंगली! 10 हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती; दुष्काळग्रस्तांसाठी 2.15 कोटींची मदत
3

Mumbai News : शिवाजी पार्कमध्ये दिवाळी पहाट रंगली! 10 हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती; दुष्काळग्रस्तांसाठी 2.15 कोटींची मदत

Diwali : जिथे अंत्यविधीनंतर कोणी थांबत नाही, तिथेच गायकवाड कुटुंबाची साजरी होते दिवाळी!
4

Diwali : जिथे अंत्यविधीनंतर कोणी थांबत नाही, तिथेच गायकवाड कुटुंबाची साजरी होते दिवाळी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.