udayanraje bhosale
सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udaynraje Bhosale) हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी व डायलॉलसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) उदयनराजे बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर टिका केली आहे. दरम्यान, छत्रपती राजघराण्यानं रयत शिक्षण संस्थेला (Rayat) जागा दिली. पण, ज्यांचे काहीही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतलं जात आहे. अशी टिका खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.
[read_also content=”खर्गे व माझ्यात वैचारिक मतभेद नाहीत, आमची लढाई भाजप व आरएसएसशी – शशी थरुर https://www.navarashtra.com/india/we-are-fight-to-bjp-and-rss-sashi-tharoor-not-between-me-and-kharge-332404.html”]
दरम्यान, पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून आता पवार शिक्षण संस्था करा, अशी टिका सुद्धा उद्यनराजेंनी पवारांवर केली आहे. रयतमध्ये राजकारण येऊ नये, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असावेत असे ठरले होते. पण काय झाले काय माहित. आता मात्र ज्यांचे योगदान नाही त्यांना घेतलं जातंय. रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था आहे, राजकारण्यांचा अड्डा नाही. अशी टिका उदयनराजेंनी शरद पवारांवर केली.