Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…आता ५० खोक्यांचा ‘खोकासूर’ आलाय; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

गद्दारच म्हणारच, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर. शिवसेनेचे काय होणार मला मात्र चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. माताभगिनी, दिव्यांग सगळेच आहेत. एकनिष्ठ इथेच आहेत. ही ठाकरेंची कमाई. रावणदहन होईल यावेळी रावण वेगळा कालानुरूप तोही बदलतो आता किती? डोक्यांचा नाही खोक्यांचा आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 05, 2022 | 09:12 PM
…आता ५० खोक्यांचा ‘खोकासूर’ आलाय; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – विजयादशमीच्या शुभेच्छा देत असतांना जुने दसरा मेळावे आजही लक्षात आहे. मी भारावून गेलो आहे असा मेळावा क्वचितच. तुमच प्रेम बघितल्यावर मुद्दे सुचत नाही हे विकत घेता येत नाही. माझ्या जीवाभावाची गर्दी म्हणून तुमच्यासमोर नतमस्तक. मुख्यमंत्री म्हणून नतमस्तक झालो होतो. अनुभव नव्हता. वाकण्याची परवानगी नाही पण तुमच्या समोर नेहमीच नतमस्तक. तुम्ही माझे जिवंत सुरक्षाकवच.

गद्दारच म्हणारच, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर. शिवसेनेचे काय होणार मला मात्र चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. माताभगिनी, दिव्यांग सगळेच आहेत. एकनिष्ठ इथेच आहेत. ही ठाकरेंची कमाई. रावणदहन होईल यावेळी रावण वेगळा कालानुरूप तोही बदलतो आता किती? डोक्यांचा नाही खोक्यांचा आहे. वाईट इतकच मी रूग्णालयात असतांना ज्यांना जबाबदारी दिली ते कटाप्पा ते कट करत होते. त्यांना कल्पना नाही हा उध्दव ठाकरे नाही उध्दव बाळासाहेब ठाकरे आहे. देव तुमच भल करो हा तेजाचा शाप. ज्यांना सगळ दिल ते नाराज ज्यांना काही दिल नाही ते माझ्या सोबत. बाळासाहेब म्हणायचे शिवसेना एकट्यादुकट्याची नाही शिवसैनिकांची तुम्ही ठरवाल मी राहायच की नाही. हे गद्दारांनी नाही तुम्ही सांगायचं. बाप मंत्री, कार्ट खासदार, सगळ माझ्याचकडे पाहिजे. का केली महाविकासाघाडी अतिशय स्पष्ट आहे. भाजपने पाठीत वार केला म्हणून तुम्ही सांगा जे केले ते योग्य होत का? मी हिंदुत्व सोडले का? सात लोकांत तेही होते मंत्रिपद घेतांना तेव्हा का बोलला नाही. आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष ठरले होते. मग आज जे घडले ते तेव्हाच का नाही केल. शिवसेना संपवायची. हाव ती किती त्याला शिवसेनाप्रमुख व्हायचा तुम्ही स्वीकारणार स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मिळत नाही. बाप चोरणारी अवलाद. आनंद दिघे वीस वर्ष झाली ते जाऊन आजवर आठवले नाही. एकनिष्ठ होते. सगळी माणसं बघितल्यावर फडणवीसांना कायदा चांगला समजतो सभ्य गृहस्थ आहेत. तुमच चांगल बोललो यात काय टोमणा. जातांना बोलून गेले मी पुन्हा येईन दीड दिवसात विसर्जन पुन्हा उपमुख्यमंत्रिपद घेऊन आले. कायदा आम्हालाही कळतो आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरे पाळायची. आमच्या पैकी कुणी बोलले तर स्थाबध्दतेचे आदेश हा कुठला कायदा चालवतात. नवी मुंबई चे पोलीसांकडून धमकी, बबन पाटलांना धमकी, महिलांना धमकी हा तुमचा कायदा. ग्रामपंचायत निवडणुकीत सुध्दा धमक्या दिल्या जातात. सलून काढलय का? मी सांगितले म्हणून सगळे शांत आहेत. कायदा तुम्ही कुरवाळत बसा.

इकडे जिवंत मेळावा तिकडे ग्लिसरीनच्या बाटल्या सगळ मिळून रडगाण सुरु आहे. आम्ही भाजप सोडली म्हणून हिंदुत्व सोडले नाही. भाजपने आमच्यावर टीका करायची. जीनाच्या थडग्यावर डोके टेकवणारे, नवाझ शरीफच्या वाढदिवसाला न बोलावता जाणारे तुम्ही, मेहबूबा सोबत सत्ता रचणारे तुम्ही. गाई वर बोलता ना अरे महागाईवर बोला पण हे जाणवू नये म्हणून तुम्हाला हिंदुत्व सांगता. डाळ, भाज्या महागले. होसबळे तुमचे अभिनंदन तुम्ही संघाला भाजपला आरसा दाखवण्याचे धाडस केले. हे केव्हा बोलले ज्यावेळला मोदी ५ जी कार्यक्रमात कौतुक करत होते त्याच्या दुसरा दिवशी होसबळे बोलले.

दसरा मेळावा पवित्र मेळावा. ही विचारांची परंपरा लोक प्रेमाने आले. शिव्या देणे सोपे विचार देणे ही परंपरा मी पुढे नेतो. २०१४ साली रुपयाचा भाव काय होता सुषमा स्वराज म्हण्याला टीव्ही लावायला भिती वाटते. आज ८० रुपये डाॅलर. स्वराज म्हण्याला ज्या देशाचा रूपया घसरतो त्या देशाची पत घसरते. अमित शहा हे घरगुती मंत्री. सरकार पाडायचे हेच काम. मी पुन्हा त्यांना आव्हान देतो. आपली जमीन परत आणून दाखवा पाकव्याप्यची.चीन घुसतोय. गद्दारांच्या पालखीत कशाला मिरवता. तिकडे शेपट्या घालायच्या इकडे मस्ती दाखवायची.

आम्हाला गुजरात बद्दल असूया नाहीए. उद्योग धंद्यासाठी सगळे प्रकल्प गुजरातेत. पुष्पा आला तो म्हणायचा झुकेंगा नही यांचे उठेंगा नही साला. १०० दिवस सरकारला होताहेत त्यापैकी ९० दिवस हे दिल्लीला, दिल्लीत मुजरा. तुमच हिंदुत्व कशावर आहे? आमच हिंदुत्व देशाशी जोडलेले आहे शेंडी जानव्याचे आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले जो प्रेम करतो देशावर तो आमचा. घराबाहेर देश हाच धर्म. पण कुणी धर्माची मस्ती आम्ही सहन करणार नाही. नुसत जपमाळ करून हिंदू होणार नाही. तुमच हिंदुत्व काय आहे? इतर धर्मीय तुमचे शत्रू. काश्मीर घटना पोलीस औरंगजेब त्याचे अतिरेक्यांनी अपहरण करुन हत्या. धर्माने कोण तर तो मुसलमान होता. तो औरंगजेब आमचा भाऊ. त्याचे वडील भाजपात जाणार होते.

देशातील लोकशाही जिवंत राहील का ही सध्या चिंता. तुम्हाला सर्वांना हा सावधानतेचा इशारा. पुन्हा गुलामगिरी येईल. देशप्रेमींनी एकत्र यावे. भागवतांच्या बद्दल आदर. ते मशिदीत गेले होते ते संवाद करायला गेले तिथे मुस्लमानांनी सांगितले ते राष्ट्रपिता मग आम्ही म्हणालो राष्ट्रपती करा. आज भागवत बोलले स्त्री पुरुष समानता. मोहनजी एक विचारायचे आहे, महिला शक्तीचा आदर ठेवतांना अंकिता भंडारीचा खून झाला रिसोर्टच्या बाजूला मृतदेह आढळला हाॅटेल मालक भाजपचा. कुठे महिला शक्तीचा आदर. तिची आई आक्रोश आहे. काय कारवाई झाली. बिल्कीस बानो दंगलीतील गर्भवती बलात्कार मुलीची हत्या. आरोपी शिक्षा भोगत होते शिक्षा माफ केली स्वागत केले हे भाजपचे विचार .महाराजांची शिकवण हे आमचे हिंदुत्व. माझा विचार होता त्यासभेला जाऊन हिंदुत्वाचे विचार ऐकून यायचे. मागे एक कार्टून आले हिंदुत्व जागृत करुन मिळेल ईडी कार्यालाय.

तोतयाचे बंड एक पुस्तक म्हणजे डुप्लिकेट. मागे एक होत तो मी नव्हेच. आता तोतये त्यांना वाटत तेच बाळासाहेब. न.चि केळकर यांच्या तोतयाचे बंड नाटक त्याच्या प्रस्तावनेचा दाखला. बाळासाहेबांचा चेहरा लावून हे तोतये आले आहेत. किती ओरबडायचे शिवाजी पार्क मिळावे. आता धनुष्यबाण हवा, शिवसेना हवी, शिवसेनाप्रमुख पद हवे. एका व्यासपीठावर सभा लावू भाजपची स्क्रीप्ट न लावता बोलून दाखवायचा. मुख्यमंत्री असतांना माझ्यासमोरचा माईक ओढला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली. हिंदुत्व सोडले म्हणता मग पाच वर्ष तुमच्या सोबत सुध्दा अशोक चव्हाणांना कोण भेटले. संभाजीनगर करुन दाखवले. दुर्दैवाने आपल्याकडून तेव्हा कोण होते मी, अनिल परब, देसाई, आदित्य सगळ्यांनी पाठिंबा दिला. त्यांना घेऊन हिंदुत्व वाढवत होतो.

अंबादास बोलले शेतकऱ्यांना मदत नाही. मी लहानपणापासून शिवसेनेवरील संकटे बघत आलो आहे. निखाऱ्या वरुन चालण्याची तयारी ठेवा. तुमच्या मदतीने शिवसेनेच्या आगीचा वणवा पेटणार आहे त्यातून हे गद्दार भस्म होतील. तुम्ही सोबत असाल तर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री. बांडगुळे गेली, त्यांना स्वतः ची ओळख नाही. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकी अंगावर घ्यावे लागेल. हात उंचावून सांगा (प्रचंड प्रतिसाद) मला विश्वास आहे महिषासूरमर्दीनी हा रावण मारल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र

Web Title: Now the khokasoor of 50 boxes has arrived uddhav thackeray targets shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2022 | 09:12 PM

Topics:  

  • Thackeray Vs Shinde
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत
1

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
4

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.