Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत; प्रत्येक गावात ‘रास्ता रोको’ करायचं”; मनोज जरांगेंचा पुन्हा यल्गार

Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी रोज सकाळी साडेदहा ते दुपारी 1 वाजेपर्यत आंदोलन करायचे. ज्यांना यावेळेत आंदोलन करणे शक्य झाले नाही, त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करायचे अशी आंदोलनाची दिशा असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले

  • By युवराज भगत
Updated On: Feb 21, 2024 | 04:14 PM
“आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत; प्रत्येक गावात ‘रास्ता रोको’ करायचं”; मनोज जरांगेंचा पुन्हा यल्गार
Follow Us
Close
Follow Us:

जालना : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज निर्णायक बैठक बोलावली होती. या बैठकीत 24 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. तोपर्यंत दोन दिवसांची मुदत सरकारला देण्यात आली आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रत्येक गावात एकाचवेळी ‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, हे सर्व आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना मनोज जरांगे यांनी बैठकीत दिल्या आहे. विशेष म्हणजे रोज सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे.

24 तारखेपासून आंदोलन केले जाणार

याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “24 तारखेपासून आंदोलन केले जाणार आहे. आपण फक्त आपले गाव सांभाळायचे, कोणीही तालुक्याला जायचे नाही. पूर्ण गाव शक्तीने एकत्रित येतील. यांना आपल्याला जेरीस आणण्यासाठी प्रत्येक गावात आंदोलन करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावात ‘रास्ता रोको’ आंदोलन करायचे आहे. यावेळी कोणीही जाळपोळ करायची नाही, परीक्षा चालू आहेत. महाराष्ट्रभर आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे आहे. सकाळी साडेदहा वाजता या आंदोलनाला सुरवात करायची. सकाळी साडेदहा ते दुपारी 1 वाजेपर्यत आंदोलन करायचे. ज्यांना यावेळेत आंदोलन करणे शक्य झाले नाही, त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करायचे. विशेष म्हणजे यापुढे हे आंदोलन रोज करायचे असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत.

निवडणुका पुढे ढकला…
शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार मंत्री यांनी आपल्या दारावर येऊ देऊ नका, असे म्हणत आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी केली जाणार आहे. निवडणूक काळात आलेल्या मंत्र्या (उमेदवाऱ्याच्या) गाड्या वापस जाऊ देऊ नका, त्याची जाळपोळ न करता ताब्यात घेऊन निवडणुका संपल्यावर परत करा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे यांना सांगितले पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

राज्यातील वृद्ध उपोषणाला बसणार…
29 तारखेपर्यंत आमच्या मागण्यांची अमलबजावणी नाही केली, तर राज्यातील वृद्ध आणि आमच्या सर्व लोकांनी आमरण उपोषणाला बसायच. उपोषणादरम्यान एकाचाही जीव गेला तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. जगात असे आंदोलन झाले नसेल हे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना कळेल. वृद्ध नागरिकांना उपोषणाला बसावे लागणार असेल तर यापेक्षा मोठी शरमेची गोष्ट सरकारसाठी असणार नाही. वयोवृद्ध पहिल्यांदा आंदोलनाला बसतील. त्यांच्यावर कारवाई झाली झाल्यास हे असे निजमांनी देखील केले नसेल. इंग्रजांनी सुध्दा केले नसते. या सरकारबद्दल वाईट भावना व्यक्त होतील, असे मनोज जरांगे म्हणाले.

Web Title: Now we have to get up everyday and stop the road in every village of state manoj jarange decided direction of movement nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2024 | 04:03 PM

Topics:  

  • Maratha community
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला
1

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा
2

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका
3

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका

Sindhudurga: ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटला तीव्र विरोध; कुडाळमध्ये दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण
4

Sindhudurga: ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटला तीव्र विरोध; कुडाळमध्ये दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.