Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari: भाविकांसाठी खुशखबर! २७ जूनपासून थेट…; मंदिर समितीचा मोठा निर्णय

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 10, 2025 | 02:35 AM
Ashadhi Wari: भाविकांसाठी खुशखबर! २७ जूनपासून थेट…; मंदिर समितीचा मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर:- आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समिती मार्फत मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी दि. 27 जून पासून 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. सदर बैठकीस मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच पुरातत्व विभागाचे रामेश्वर निपाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, सर्व खाते प्रमुख, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे व जतन – संवर्धनाचे ठेकेदार उपस्थित होते.
शुद्ध आषाढी एकादशी दि. 06 जुलै रोजी आहे. यात्रेचा कालावधी दि.26 जून ते दि.10 जुलै असा आहे. शासकीय महापूजा 2.20 वाजता .मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात असून, टोकन दर्शन प्रणालीची दिनांक 15 जून रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
   तसेच आषाढी यात्रेत भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्यावर मंदिर समितीचा भर राहणार असून, दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून वॉटरप्रुफ मंडप, 4+6 पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाईव्ह दर्शन, कुलर फॅन, सार्वजनिक सूचना प्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षा रक्षक नियुक्ती, आपत्कालिन सुविधा, चहा खिचडी वाटप, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, 24 तास अन्नछत्र, बँग स्कॅनर मशिन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम इत्यादी स्वरूपाच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याबाबतची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
प्रतिवर्षीप्रमाणे विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देणे, टोकन दर्शनाची चाचणी घेणे इत्यादी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 16 किंवा 17 जून रोजी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात येणार आहे. असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.
 त्याचबरोबर चंदनउटी पुजेची दि. 13 जून रोजी सांगता पुजा होणार असून, श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा अनुक्रमे सदस्या ॲड माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न व मानवसेवा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.

Web Title: Oashadhi wari 24 hour darshan will be available for all devotees in pandharpur gahininath maharaj osekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur News
  • Shri Vitthal Rukmini Temple

संबंधित बातम्या

केअर टेकर महिलेनेच केला हातसाफ, पंढरपूरमधील चाेरीचा उलगडा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

केअर टेकर महिलेनेच केला हातसाफ, पंढरपूरमधील चाेरीचा उलगडा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश
2

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश

कासेगाव येथे लाखो रूपयांचा अवैध खतसाठा जप्त; जिल्हास्तरीय पथकाकडून धडक कारवाई
3

कासेगाव येथे लाखो रूपयांचा अवैध खतसाठा जप्त; जिल्हास्तरीय पथकाकडून धडक कारवाई

गावात ना शिक्षक नियमित, ना डॉक्टर तरीही पगार मात्र खात्यात; पंढरपुरात अजब कारभार समोर
4

गावात ना शिक्षक नियमित, ना डॉक्टर तरीही पगार मात्र खात्यात; पंढरपुरात अजब कारभार समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.