Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसी समाज आक्रमक; ‘या’ तारखेला बारामतीत एल्गार मेळावा

ओबीसी समाजाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी बारामतीत एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2025 | 04:22 PM
मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसी समाज आक्रमक; 'या' तारखेला बारामतीत एल्गार मेळावा

मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसी समाज आक्रमक; 'या' तारखेला बारामतीत एल्गार मेळावा

Follow Us
Follow Us:

बारामती : मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी बारामतीत एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी हा मेळावा होणार असून, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ॲड मंगेश ससाणे, मृणाल ढोले हेही उपस्थित राहणार असून, या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने निर्णय केल्यानंतर संपूर्ण राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बारामतीत देखील एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवदनात म्हटले आहे की,  महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा टिकवणे व लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे, हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान केलेल्या कृतींमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. धनगर समाजाबद्दल अवमानजनक, अपशब्दयुक्त व शिवराळ भाषा वापरून समाजाचा अपमान, ओबीसी धनगर आणि मराठा समाजांमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा भंगविण्याचा प्रयत्न, राज्यातील घटनात्मक पद्धतीने पदावर असलेले सर्वोच्च लोकप्रतिनिधी म्हणजे मुख्यमंत्री व त्यांच्या परिवाराला अर्वाच्य भाषेत शिव्या देणे व धमकावणे. वारंवार लोकनियुक्त लोकशाही सरकार पाडण्याची घोषणा करणे, आरक्षण हा पूर्णतः न्यायालयीन व प्रशासकीय विषय असूनही, उपोषणाद्वारे मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेण्याचा दडपशाहीद्वारे दबाव टाकणे, ज्यामुळे ओबीसी घटकांमध्ये असंतोष पसरतो. राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येते. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीचा त्यांनी भंग केला. न्यायालयाचा स्पष्ट अवमान केला.

छगन भुजबळ नाराज

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले होते. सरकारने पाचव्या दिवशी त्यावर एक तोडगा काढला. त्यांच्या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्यावर सरकारने सहमती दर्शवली. याविषयीचा एक शासन निर्णय घेण्यात आला. त्यावरून काही ओबीसी नेते अस्वस्थ झाले आहे. सरकारने दबावात निर्णय घेतल्याचा आणि ओबीसीत कुणबी घुसवल्याची चर्चा सुरू आहे. मंत्री छगन भुजबळही नाराज आहेत. त्यांनी कालच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता.

Web Title: Obc community has become aggressive after the decision on maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal News
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
1

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
2

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार
3

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार

मनोज जरांगेंच्या ‘आमदार पाडू’च्या इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांचं थेट चॅलेंज; म्हणाले, ‘उमेदवार उभे करा, क्षमता सिद्ध करा’
4

मनोज जरांगेंच्या ‘आमदार पाडू’च्या इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांचं थेट चॅलेंज; म्हणाले, ‘उमेदवार उभे करा, क्षमता सिद्ध करा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.