आम्हाला XXXया समजतात का?, CM फडणवीसांबाबत बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली
ओबीसी समाजाला जाणिवपूर्वक निधी दिला जात नाही, तुम्ही आम्हाला XXXया समजता का?, असं वादग्रस्त व्यक्तव्य लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलतााना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला असून त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. परळीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसली.
Breaking News: आता मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
ओबीसींना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसह सर्व पक्षांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही हाके यांनी दिला आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही काही दिवसांपासून एकेरी उल्लेख करत आहेत. आज देखील त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मात्र त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांनाही टार्गेट करत वादग्रस्त विधान केलं आहे.
Pankaja Munde News: ‘तो दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दुखद आणि उद्ध्वस्त करणारा होता’: पंकजा मुंडे
दरम्यान ओबीसींच्या प्रश्नावर ओबीसी समाजाचे मंत्री आणि आमदार गप्प बसतात, अशी टीका करत त्यांनी. मुख्यमंत्र्यांनी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणासाठी ते लढा देत असून ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलं होतं.
काल लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार अमित शाहांच्या रीचार्जवर. मात्र आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का? असा संतप्त सवाल त्यांनी केला होता. तसंच माझा दारूच्या बाटलीसोबतचा फोटो एआय जनरेटेड होता. तर अजित पवारांनी दारूचा कारखाना बंद करावा, प्यायचा प्रश्न येतोच कुठे? असंही त्यांनी म्हंटलं होतं. हाकेंनी यावेळी आमदार अमोल मिटकरी यांचा उल्लेख माकड असा केला आहे.
आम्हाला निधी देताना हाताला लकवा मारतो का अजित पवार? तुम्ही आर्थिक नियोजन करण्यासाठी आहात. जो समाज सोशीत आहे, पीडित आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही शिष्यवृत्ती मागत आहे. पण तुम्ही भुरटे, गरदुल्ले ज्यांना गावात कोणी विचारत नाही अशी माणसं माझ्यावर सोडत आहात? असं म्हणत त्यांनी अमोल मिटकरींवर टीका केली होती.