On behalf of MSLTA, India's Dev Javia advanced to the $25,000 Men's ITF Tennis Tournament
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने 25 हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या देव जावियाने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताचता सेंथिल कुमार रेथिन प्रणवचा 6-4, 4-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
जागतिक क्रमवारीत 688व्या स्थानी
एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात एकेरीत जागतिक क्रमवारीत 688व्या स्थानी असलेल्या भारताच्या देव जावियाने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताचा सेंथिल कुमार रेथिन प्रणवचा 6-4, 4-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. हा सामना २ तास ३७ मिनिटे चालला. जागतिक क्रमवारीत 892व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या आधित्य गणेशन याने जागतिक क्र.599 असलेल्या फ्रांसच्या आर्थर वेबरचा 6-2, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश
दुहेरीत पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित भारताच्या एसडी प्रज्वल देव व आदिल कल्याणपूर या जोडीने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या आदित्य बलसेकर व युवान नांदल यांचा 6-0, 6-1 असा तर, भारताच्या तिसऱ्या मानांकित सिद्धांत बांठिया व विष्णू वर्धन या भारताच्या जोडीने अमेरिकेच्या निक चॅपेल व भारताच्या नितीन कुमार सिन्हा यांचा 4-6, 6-1, 10-6 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताच्या देव जाविया व करण सिंग यांनी मानस धामणे व काहीर वारिक यांचा 6-3, 6-4 असा पराभव केला.
निकाल : मुख्य ड्रॉ : पहिली फेरी: एकेरी :
आधित्य गणेशन (अमेरिका) वि. वि. आर्थर वेबर (फ्रांस) 6-2, 6-4;
देव जाविया (भारत)वि.वि.सेंथिल कुमार रेथिन प्रणव (भारत) 6-4, 4-6, 6-4;
दुहेरी :
एगोर अगाफोनोव/बोगदन बोबरोव्ह(रशिया)[1] वि.वि.ऋषभ अग्रवाल/ऋषी रेड्डी(भारत)6-4, 6-7(4), 10-8;
आर्यन शहा (भारत)/आधित्य गणेशन (अमेरिका)वि.वि.सिद्धार्थ रावत/सिद्धार्थ विश्वकर्मा (भारत) 7-5, 6-0;
एसडी प्रज्वल देव/आदिल कल्याणपूर(भारत)[2]वि.वि.आदित्य बलसेकर/युवान नांदल(भारत) 6-0, 6-1;
एम रिफ्की फित्रियादी(इंडोनेशिया)/जंग युनसेओक(कोरिया)वि.वि.अनुप बंगार्गी/प्रसाद इंगळे(भारत) 6-2, 6-2;
सिद्धांत बांठिया/विष्णू वर्धन[3](भारत)वि.वि.निक चॅपेल(अमेरिका)/नितीन कुमार सिन्हा(भारत) 4-6, 6-1, 10-6;
देव जाविया/करण सिंग(भारत)वि.वि.मानस धामणे/काहीर वारिक(भारत) 6-3, 6-4