Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरावर स्लॅब टाकताना अचानक विजेचा बसला जोरदार झटका; एकाचा मृत्यू तर 14 जण जखमी

ओम प्रकाश केशवराव जांभळे (१७) असे मृत बांधकाम कामगार मुलाचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2025 | 09:35 AM
Worker dies after falling from roof

Worker dies after falling from roof

Follow Us
Close
Follow Us:

अकोला : एका घराचा स्लॅब टाकण्यात आल्यावर सिमेंट काँक्रेटचे मिक्सर बाहेर काढताना अपघात झाला. यामध्ये 14 मजुरांना विजेचा जोरदार धक्का बसल्याची घटना जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात घडली. या दुर्दैवी घटनेमध्ये एका अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या वडगाव रोठे गाव येथील रहिवासी वसंता बरिंगे यांच्या घरी स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले. बांधकाम आटोपल्यानंतर सिमेंट काँक्रेटचे मिक्सर काढले जात होते. त्यावेळी अचानक विजेचा प्रवाह त्यामध्ये आला.

दरम्यान, या मिक्सरला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यामध्ये विजेचा प्रवाह आला. त्यामुळे मिक्सरला स्पर्श केलेल्या सर्व १४ मजुरांना विजेचा जबरदस्त झटका बसला. एका अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाला.

सात-आठ जण जखमी

ओम प्रकाश केशवराव जांभळे (१७) असे मृत बांधकाम कामगार मुलाचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. विजेचा धक्का बसलेल्या मजुरांपैकी सात ते आठ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर तेल्हाराच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या धक्कादायक व दुर्दैवी घटनेनंतर संबंधित बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला. तेल्हारा पोलिस त्याचा शोध घेत आहे.

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आला ऐरणीवर

बांधकाम कामगार आपल्या जीवावर उदार होऊन काम करत असतात. या कामगारांना पुरेशा सुरक्षा साधनांचा पुरवठा संबंधित ठेकेदाराकडून केला जात नाही. त्यामुळे दुर्घटना होऊन कामगारांना जीव देखील गमवावा लागतो. याच प्रकारची घटना तेल्हारा तालुक्यात घडली. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी थेट कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडला होता. पण यामुळे शेतात जागलीला असलेल्या शेतकरी दाम्पत्यालाच जीव गमवावा लागला. विजेचा धक्का लागून दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाचप्रकारची घटना समोर आली आहे.

Web Title: One died and 14 injured in akola due to electricity shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • akola news
  • Youth Died

संबंधित बातम्या

औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक; अकोल्यात वातावरण तापणार? शिवसेनेची आक्रमक भूमिका
1

औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक; अकोल्यात वातावरण तापणार? शिवसेनेची आक्रमक भूमिका

महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल
2

महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल

हायटेन्शन तारांना चुकून हात लागला; मायलेकीला विजेचा जोरदार झटका बसला अन् क्षणात…
3

हायटेन्शन तारांना चुकून हात लागला; मायलेकीला विजेचा जोरदार झटका बसला अन् क्षणात…

विजेच्या तीव्र धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; क्षणात झालं होत्याचं नव्हतं…
4

विजेच्या तीव्र धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; क्षणात झालं होत्याचं नव्हतं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.