mp supriya sule target mahayuti government over developmental projects in pune
पुणे: बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांमुळे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका अद्यापही सुरूच आहे. हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या आढावा बैठकीत केली गेली. धनंजय मुंडे हे अजित पवार गटात सामील झाल्यानंतर, त्यांच्यावर शरद पवार गटाकडून वारंवार निशाणा साधला जात आहे.
पुण्यातील पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं आहे. “१०० दिवसांमध्ये महायुतीमधील एका मंत्र्याची विकेट गेली. सहा महिने आणखी थांबा, आणखी एक विकेट पडेल. राज्यातील एक मंत्री खूप बोलत आहेत. हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानांमुळे त्या नेमके कोणत्या मंत्र्यांचा उल्लेख करत आहेत, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Maharashtra Council Bypoll 2025: एका जागेसाठी इच्छुकांची तोबागर्दी; अजित पवारांकडून संधी कुणाला?
पुण्यातील याच बैठकीत सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून महायुती सरकारवर टीका केली. त्यांनी बोपदेव घाटातील मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख करून सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत, “गृहमंत्र्यांना लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाला जायला वेळ आहे, पण पीडितेवर होत असलेल्या अन्यायाबाबत कारवाई करायला वेळ नाही,” असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
सुळे यांनी असेही म्हटले की, “शंभर दिवसांत एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे.” त्यांनी एका मंत्र्यावर टीका करताना म्हटले की, “जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो.” तसेच, “हिम्मत असेल, तर समोर येऊ लढ,” असे आव्हानही दिले. त्यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांनी बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांना मास्टरमाइंड म्हणून संबोधलत त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. तसेच,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.